Join us

खरंच कियारा अडवाणी वापरते सोन्याचा ब्रश ? फोटो शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 16:08 IST

कियारा अडवाणी अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

Kiara Advani : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कियारा आडवाणीची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. कियाराचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. यामध्ये 'गेम चेंजर', 'वॉर 2', 'डॉन 3' यांचा समावेश आहे.  अशातच आता कियाराने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. 

कियारा अडवाणी ही सर्वसामान्यांप्रमाणेच सकाळी ब्रश करुन दिवासाची ताजीतवानी सुरूवात करते. पण त्या ज्या ब्रशने ती दात स्वच्छ करते,  तो सोन्याचा असल्याचं बोललं जात आहे. कारण, कियारा अडवाणीने इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिच्या हातात सोनेरी ब्रश आहे. सोनेरी ब्रशचा हा फोटो शेअर करताना तिने लिहिले की, "न सांगता मला सांगा की तुम्ही सिंधी आहात". कियारा अडवाणीचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. 

कियारा अडवाणी सोन्याचा ब्रश वापरते का? हाच प्रश्न तिला प्रत्येकजण विचारत आहे. तथापि, कियारा अडवाणीच्या हातातील ब्रश खराच सोन्याचा आहे की फक्त सोनेरी रंगाचा आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. कियारा ही सिंधी कुटुंबातील आहे. तिचे लग्न पंजाबी कुटुंबातील सिद्धार्थ मल्होत्रासोबत झाले आहे. कियारा लवकरच 'गेम चेंजर' सिनेमात सुपरस्टार राम चरणसोबत झळकणार आहे. तर 'वॉर २' मध्ये हृतिक रोशन-किआरा अडवाणी यांची फ्रेश जोडी दिसणार आहे. तर  'डॉन 3'मध्ये ती अभिनेता रणवीर सिंगसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. 

टॅग्स :कियारा अडवाणीसिद्धार्थ मल्होत्राबॉलिवूडसेलिब्रिटी