बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी नुकतेच लग्न बंंधनात अडकले आहेत. लग्नानंतर हे जोडपे एका पुरस्कार सोहळ्यात स्पॉट झाले. यावेळी, कियारा आडवाणीने लग्नाच्या दिवसाचा एक मनोरंजक किस्सा सांगितला. ती म्हणाली की, सिद्धार्थला वराच्या गेटअपमध्ये पाहून ती भावुक झाली.
खरेतर, नुकतेच सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांनी न्यूज 18 च्या शोशो रील अवॉर्ड्स नाईटमध्ये हजेरी लावली. या दरम्यान, सिड आणि कियाराचे बरेच फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले. दरम्यान, कियाराने या प्रसंगी तिच्या लग्नाच्या दिवसाविषयी सांगितले. कियारा म्हणाली की, 'लग्नाच्या दिवशी, जेव्हा मी दाराजवळ प्रतीक्षेत होते, तेव्हा माझ्या मनात असे होते की यार मी लग्न करणार आहे. पण जेव्हा मी सिद्धार्थला क्षणभर पाहिल्यानंतर मी भावनिक झाले. तिच भावना घेऊन मी पुढे सरकली. नक्कीच, जर आपण आपल्या प्रेमाशी लग्न केले तर ही भावना नक्कीच आपल्या मनात येईल.
७ फेब्रुवारीला राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगड पॅलेसमध्ये सिद्धार्थ आणि कियाराने सात फेरे घेतले. त्यानंतर ९ फेब्रुवारीला दिल्लीत आणि १२ फेब्रुवारीला मुंबईत लग्नाचं रिसेप्शन ठेवले होते.