साऊथ सुपरस्टार किच्चा सुदीपची मुलगी सान्वी सुदीप हिने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. सान्वी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासाठी इतकी वेडी होती की, जेव्हा त्याचं लग्न झालं तेव्हा ती ढसाढसा रडली. सान्वीने सांगितलं की, करण जोहरच्या २०१२ मध्ये आलेल्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राला पहिल्यांदा पाहिल्यापासून तिचं त्याच्यावर खूप प्रेम होतं. पण जेव्हा सिद्धार्थने कियारा अडवाणीशीलग्न केलं तेव्हा ती इतकी दुःखी झाली की खूप रडली आणि रडण्यामुळे ती आजारी पडली. सिद्धार्थ आणि कियारा यांचं २०२३ मध्ये लग्न झालं.
यूट्यूब चॅनल जिनल मोदीशी झालेल्या चर्चेदरम्यान, सान्वीने खुलासा केला की, अल्लू अर्जुन व्यतिरिक्त सिद्धार्थ मल्होत्रा हा तिचा सर्वात जास्त काळ असणारा सेलिब्रिटी क्रश होता. "मी त्याला पाहिलं, तेव्हापासूनत तो माझा क्रश होता. जेव्हा त्याचं लग्न झालं तेव्हा मी खूप रडले. मी माझ्या इन्स्टा स्टोरीवर एक मीम देखील पोस्ट केलं होतं ज्यामध्ये ‘Alexa, play Channa Mereya’ असं लिहिलं होतं" असं सान्वीने म्हटलं.
सिद्धार्थच्या लग्नापूर्वी सान्वी त्याचे सर्व फोटो आणि पोस्टर्स तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर करायची आणि ते हायलाइट्समध्ये सेव्ह करायची. एक वेळ अशी आली जेव्हा तिच्या प्रोफाइलवर ७०० हून अधिक स्टोरीज फक्त सिद्धार्थ मल्होत्राच्या पोस्टने भरलेल्या होत्या. पण लग्नानंतर तिने हे सर्व डिलीट केलं. "प्रत्येक हायलाइटमध्ये १०० स्टोरीज असतात आणि माझ्या प्रोफाइलमधील सात हायलाइट्स फक्त सिद्धार्थच्या फोटोंनी भरलेल्या होत्या. मग मला वाटलं की ते आता ठेवणं थोडं विचित्र होईल, म्हणून मी सर्व काही डिलीट केलं. मी ते डिलीट करत असतानाही रडत होते, पण तरीही मी ते केलं" असं सांगितलं.
जर ती भविष्यात अभिनेत्री झाली आणि सिद्धार्थने तिची प्रोफाइल पाहिली तर कसं वाटेल? सान्वी हसली आणि म्हणाली, "जर मी अभिनेत्री झाले आणि त्याने माझे प्रोफाइल तपासले तर त्याला काय वाटेल की माझं संपूर्ण सोशल मीडिया फक्त त्याच्याशी संबंधित आहे. असा विचार करून मी सर्व काही पोस्ट डिलीट केल्या आहेत. मी त्याच्या लग्नाचा व्हिडीओ पाहण्यास नकार दिला होता."