स्टार प्लसवरील नवीन मालिका 'कर्णसंगिनी'मध्ये अभिनेता आशिम गुलाटी कर्णाची भूमिका साकारत असून या भूमिकेतून तो रसिकांंची मन जिंकतो आहे. ही पौराणिक व्यक्तिरेखा असल्यामुळे या भूमिकेसाठी त्याला खूप मेहनत घ्यावी लागते आहे.
आशिम गुलाटी दररोज सकाळी ५ वाजता उठतो. चित्रीकरणामध्ये अनेकदा विलंब होतो आणि खूप मेहनतही घ्यावी लागते. तरी त्याच्या दिनक्रमात तो खंड पडू देत नाही. याबाबत त्याने सांगितले की, मी माझे एक वेळापत्रक आखले आहे. त्याप्रमाणे मी दररोज सकाळी ५ वाजता उठतो. कर्णाच्या भूमिकेसाठी माझी शरीरयष्टी राखण्यासाठी मी किक बॉक्सिंग शिकतो आहे, त्यामुळे मी तिथे जातो. रोज ध्यान करतो आणि स्वतःला सकारात्मक राखण्यासाठी मंत्रोच्चार करतो. त्यानंतरच सेटवर जातो.
महाभारताच्या पार्श्वभूमीवरील 'कर्णसंगिनी' या मालिकेत सामाजिक प्रथेच्या विरोधात जाऊन जातीबाहेर टाकलेल्या राजा कर्णशी लग्न करणाऱ्या उरुवीची कथा सादर करण्यात आली आहे. या मालिकेत गौतम गुलाटी, मदिराक्षी मुंडले मुख्य भूमिकेत आहेत. 'कर्णसंगिनी' ही कविता काणे यांची कादंबरी 'कर्णाज् वाईफः दि आऊटकास्ट क्वीन'वर आधारित आहे. या मालिकेत सामाजिक प्रथेच्या विरोधात जाऊन जातीबाहेर टाकलेल्या राजा कर्णशी लग्न करणाऱ्या उरुवीची कथा सादर करण्यात आली आहे. महाकाव्य महाभारताची माहिती नसलेली बाजू या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.