हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दशियनसारखं दिसणं एका मॉडेलला चांगलंच महागात पडलं आहे, किम कार्दशियनसारख दिसण्यासाठी तिने प्लास्टिक सर्जरी केली आणि वयाच्या अवघ्या ३४व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मॉडल क्रिस्टीना एश्टनला सर्जरीनंतर हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे.
क्रिस्टीना एश्टन ही किम कार्दशियनची हमशकल म्हणून ओळखली जायची. हुबेहुब किम कार्दशियनसारखं दिसण्यासाठी तिने जगभर फिरुन अनेक प्लास्टिक सर्जरी करुन घेतल्या होत्या. सर्जरी केल्यानंतर ती हुबेहुब किम कार्दशियनसारखी दिसू लागली होती. त्यानंतर तिच्या फॅन फॉलोविंगमध्येही प्रचंड वाढ झाली होती. क्रिस्टीनाचे इन्स्टाग्रामवर सहा लाखांहून अधिक फॉलोवर्स होते.
क्रिस्टीना एश्टन ही किम कार्दशियनची कार्बन कॉपी म्हणून ओळखली जायची. हुबेहब किम कार्दशियनसारखं दिसण्यासाठी तिने अनेक प्लास्टिक सर्जरी करुन घेतल्या होत्या. सर्जरीनंतर ती किम कार्दशियनसारखी दिसू लागली होती. याच कारणामुळे तिच्या फॅन फॉलोईंगमध्ये देखील वाढ झाली होती. किमसारखे दिसण्यासाठी अनेक प्लास्टिक सर्जरी केल्यानंतर ती जगभरात प्रसिद्ध झाला. मात्र, क्रिस्टनचे वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.