Join us

सिक्सर किंग युवराज सिंगने केली 'सिक्सर' वेब सीरिजची घोषणा, शिवंकित सिंग परिहार दिसणार मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2022 6:43 PM

'सिक्सर' वेब सीरिज ११ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अॅमेझॉन मिनिटीव्हीने आज आपल्या आगामी सिक्सर या क्रीडानाट्याची घोषणा केली आहे. TVFची निर्मिती आणि चैतन्य कुंभकोणम यांचे दिग्दर्शन असलेल्या सिक्सरमध्ये बॅचलर्स व अस्पायरंट्स फेम शिवंकित सिंग परिहार प्रमुख भूमिकेत आहे. ही सीरिज ११ नोव्हेंबरपासून केवळ अॅमेझॉन मिनीटीव्हीवर मोफत स्ट्रीमिंगसाठी सज्ज आहे. या आगामी क्रीडानाट्याचे ट्रेलर निकुंज शुक्ला अर्थात ‘निक्कू’ या इंदोरच्या विजयनगरमधील तरुण क्रिकेटपटूच्या आयुष्याची झलक दाखवते. शिवंकितची ही व्यक्तिरेखा ही खंद्या क्रिकेटप्रेमीची आहे, त्याला योग्य हेतूने क्रिकेटचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आहे.  

“आगामी क्रीडानाट्य ‘सिक्सर’च्या माध्यमातून अॅमेझॉन मिनीटीव्हीशी सहयोग करता आला याचा मला खूपच आनंद वाटतो. जहाँ है सिक्सर और क्रिकेट, वहाँ हे युवी! (जेथे षटकार व क्रिकेट आहेत, तेथे युवी आहे). ही कथा खूपच सुंदर आणि स्मरणात राहण्याजोगी आहे, आणि या कथेने मला मी टेनिस बॉलने क्रिकेट खेळायचो त्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून दिली. अॅमेझॉन मिनिटीव्ही भारतभरातील प्रेक्षकांसाठी एवढा अप्रतिम क्रीडाविषयक आशय मोफत आणत आहे याचा मला खूप आनंद वाटतो,” असे एकेकाळचा क्रिकेटिंग  आयकन आणि किंग ऑफ सिक्सर्स युवराज सिंग म्हणाला. 

सिक्सर ही आपल्या निखळ आनंदासाठी व खेळाबद्दल वाटणाऱ्या प्रेमापोटी क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येकाची कथा आहे. ही सीरिज ११ नोव्हेंबरपासून अॅमेझॉन मिनीटीव्हीवरून मोफत स्ट्रीम केली जाणार आहे.
टॅग्स :युवराज सिंग