पंजाबमधील चंडीगढ येथे अभिनेत्री किरण खेर यांचा १४ जून, १९५५ साली शीख कुटुंबात जन्म झाला. सिनेमा, रिएलिटी शो व्यतिरिक्त किरण खेर यांनी राजकारणातही आपली छाप उमटविली आहे.
किरण खेर यांनी १९८५ साली अभिनेते अनुपम खेर यांच्यासोबत लग्न केले. त्या दोघांची पहिल्यांदा चंडीगढमध्ये भेट झाली होती. ते दोघे एकाच थिएटरमध्ये काम करत होते. कामादरम्यान ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र झाले आणि त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. किरण खेर यांनी १९८० साली चित्रपटांमध्ये काम मिळवण्यासाठी मुंबई गाठली. याच दरम्यान किरण खेर यांना एका मोठ्या बिझनेसमॅन गौतम बेरी यांच्यावर प्रेम झालं आणि त्या दोघांनी लग्नदेखील केलं.
नाटक संपल्यानंतर त्या दोघांना जाणवलं की त्यांच्यात काहीतरी आहे. त्यानंतरच्या भेटीत अनुपम खेर यांनी किरण यांना प्रपोझ केला. त्यानंतर ते दोघं वारंवार भेटले आणि त्यांच्यातील नातं आणखीन बहरत गेलं.
त्यानंतर त्या दोघांनी आपल्या पार्टनरना घटस्फोट दिला आणि १९८५ मध्ये ते विवाहबद्ध झाले. लग्नानंतर अनुपम यांनी सिकंदरला आपले आडनाव लावले. किरण खेर व अनुपम खेर यांना एकही मुल नाही.
या दरम्यान असंही वृत्त आलं होतं की त्या दोघांमध्ये मतभेद निर्माण झालेत पण किरण यांनी परिस्थितीशी सामना केला आणि आज हे कपल आपल्या जीवनात खूप आनंदी आहेत.