Join us  

'...त्यांची टर उडवायची हे बरे न्हवं', सोनाली कुलकर्णीच्या 'त्या' पोस्टवरून किरण मानेंनी सुनावले खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2022 4:21 PM

किरण माने (Kiran Mane) यांनी आपल्या सोशल अकाउंटवर सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni)च्या पोस्टवर परखडपणे मत व्यक्त केले.

मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून बऱ्याच मराठी कलाकारांनी देखील नुकतेच आपल्या सोशल अकाउंटवरून मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळाल्या. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी(Sonalee kulkarni)ला मराठी भाषा दिनानिमित्त शेअर केलेल्या पोस्टमुळे ट्रोल करण्यात आले. इतकेच नाही तर अभिनेता किरण मानें (Kiran Mane)नी तिला चांगलेच खडेबोल लगावले आहेत.  

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने देखील हटके अंदाजातून शुभेच्छा दिल्या त्यात तिने म्हटले की, न आणि ण.. श आणि ष…ळ आणि ड, चांदणीमधील च आणि चंद्रामधील च, जहाजमधील ज आणि जीवनामधील ज यांच्या उच्चारातील फरक कळणाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! बाकीच्यांना मराठी भाशा दिणाच्या मणापासून षुभेच्छा!!!…’सोनालीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव केला. तर काहींनी तिच्या प्रमाण भाषेवर कौतुकाची स्तुती सुमनं उधळली आहेत तर काहींनी टीका करत तिला धारेवर धरलेलं पाहायला मिळाले. यातून किरण माने यांनी केलेली कमेंट मात्र बहुतेकांचे लक्ष्य वेधून घेणारी ठरली आहे.

किरण माने यांनी आपल्या सोशल अकाउंटवर सोनालीच्या पोस्टवर परखडपणे मत व्यक्त केले. त्यांनी लिहिले की, ‘उच्चार चुकवणार यांनी ‘डॅन्स’ची एक लाखाची सुपारी दिली की पारावर आणि ट्रालिवरबी नाचायचं… आणि इकडं येऊन त्यांची टर उडवायची हे बरे न्हवं. अस्सल सातारीत बोलनार या कायम ण ला न म्हन्नार या आमच्या लाडक्या राज्यांच्या वाढदिवसाला परवा परवाच साताऱ्यात नाचून गेल्यात म्याडम…या नाट्यांना प्रमाणभाषेत बोलनारं कुत्रंबी ईचारत नाय. सगळं यश मिळवलंय ते ग्रामीन भूमिका करूनच. लिश्ट काढा हिट पिच्चरची.’ किरण माने यांनी लिहिलेल्या या कमेंटला अनेकांनी पसंती दर्शवली. दरम्यान सोनाली कुलकर्णीने आपली ही मराठी भाषा दिनानिमित्त लिहिलेली पोस्ट फेसबुकवरून लगेच हटवली. 

टॅग्स :सोनाली कुलकर्णीकिरण माने