Join us

'कुणीतरी कन्याकुमारीहून समुद्रमार्गे डंकी वाटेने..'; किरण मानेंचा खोचक टोमणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 1:06 PM

किरण मानेंनी कोणाचंही नाव न घेता मोजक्या शब्दात एक पोस्ट लिहिलीय. जी चांगलीच व्हायरल झालीय (kiran mane)

आज  लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. भाजपा, कॉंग्रेस, शिवसेने उद्धव ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा सर्वच पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये चुरशीचा सामना बघायला मिळतोय. पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होणार की कॉंग्रेसचे राहूल गांधी मतांमध्ये मुसंडी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. अशातच अभिनेते किरण माने यांनी पंतप्रधान मोदींचं नाव न घेता खोचक टोमणा मारला आहे.

किरण मानेंची पोस्ट

किरण मानेंनी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. ज्यात ते लिहितात, "कुणीतरी कन्याकुमारीहून समुद्रमार्गे 'डंकी' वाटेने इंग्लंडला जाऊन 'पोलीटिकल असायलम' मागण्याची शक्यता आहे. Keep your eyes peeled ! #Dunki_effect" अशी पोस्ट मानेंनी लिहिली आहे. मानेंच्या या पोस्टवर अनेकांनी हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. 'आज तर लैच खतरनाक पोस्ट येतं आहेत....'  अशा कमेंट करत लोकांनी मानेंच्या पोस्टला सहमती दर्शवली आहे.

निवडणूक निकालाआधी मोदींची ध्यानधारणा

किरण मानेंनी कोणाचं नाव घेतलं नसलं तरीही अनेकांना ही पोस्ट मोदींना उद्देशून आहे असं वाटत असून लोक कमेंट करत आहेत. यामागचं कारण म्हणजे.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराच्या तोफा थंडावल्यावर थेट कन्याकुमारी गाठले आणि मौन व्रत तसेच ध्यानसाधनेचा संकल्प केला. ४५ तास नरेंद्र मोदींनी ध्यानसाधना आणि मौन व्रताचरण  केले. कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये पंतप्रधान मोदींची ध्यानसाधना केली.

टॅग्स :नरेंद्र मोदीकन्याकुमारीस्वामी विवेकानंदभाजपाकाँग्रेसशिवसेना