७०च्या दशकात मुंबईला अंडरवर्ल्डचा विळखा होता. त्या काळातील मुंबईतील गुन्हेगारी विश्वावर भाष्य करणारे अनेक चित्रपटही प्रदर्शित झाले आहेत. आता यात ‘बम्बई मेरी जान’ या वेब सीरिजची भर पडली आहे. सुजात सौदागर दिग्दर्शित बम्बई मेरी जान या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरमधून गुन्हेगारी विश्वातील थरारक मुंबईची झलक पाहायला मिळत आहे.
‘बम्बई मेरी जान’ या वेब सीरिजमधून एक ईमानदार पोलीस अधिकारी आणि त्याचा कुख्यात गुंड असणारा मुलगा यांची गोष्ट दाखविण्यात आली आहे. इस्माइल कादरी हा पोलीस अधिकारी मुंबईतील गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याचा मुलगा दारा कादरी गँगस्टर बनतो. त्यानंतर ईमानदारीने आपलं कर्तव्य बजावणारा इस्माइल काय करतो? याची छोटी झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. ट्रेलरमधील संवाद आणि खिळवून ठेवणाऱ्या दृश्यांनी वेब सीरिजबद्दलची उत्सुकता ताणली जात आहे. मुंबईतील गुन्हेगारी विश्वासह एका बापलेकाच्या नात्याची गोष्टही या सीरिजमधून पाहायला मिळणार आहे.
Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’च्या घरात गश्मीर महाजनी एन्ट्री घेणार? खुलासा करत म्हणाला, “मी तीन वेळा...”
‘बम्बई मेरी जान’ वेब सीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेता के के मेनन मुख्य भूमिकेत आहे. या सीरिजमध्ये त्याने कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. तर अविनाश तिवारी त्याच्या मुलाच्या भूमिकेत आहे. या सीरिजमध्ये कृतिका कामरा, निवेदिता भट्टाचार्य, अमायरा दस्तूर या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. अभिनेता फरहान अख्तरच्या एक्सेल एंटरटेनमेंटने या सीरिजची निर्मिती केली आहे. अमेझॉन प्राइमवर ही वेब सीरिज १४ सप्टेंबरला प्रदर्शित केली जाणार आहे.