Join us

फोटोतील रडणाऱ्या अभिनेत्याला ओळखलं का? 250 रुपये पहिली कमाई करणारा आज आहे कोटयधीश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 4:14 PM

Bollywood actor: हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी त्याला ओळखलेलं नाही.परंतु, हा चिमुकला कोणी साधासुद्धा नसून प्रसिद्ध अभिनेता आहे.

सोशल मीडियावर दररोज असंख्य फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात खासकरुन सेलिब्रिटींशी निगडीत काही असेल तर ते वाऱ्यासारखं पसरत जातं. बऱ्याचदा ही कलाकार मंडळी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी त्यांच्या बालपणीचे फोटो, व्हिडीओ वा एखादा किस्सा शेअर करत असतात. सध्या नेटकऱ्यांमध्ये अशाच एका लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्याचा फोटो व्हायरल होत आहे. हा अभिनेता आज लोकप्रिय स्टार असून चॉकलेट हिरो म्हणूनही ओळखला जातो. इतंकच नाही तर त्याने त्याच्या करिअरची सुरुवात अगदी २५० रुपयांच्या मानधनापासून केली होती.

सध्या सोशल मीडियावर एका लहान मुलाचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये हा चिमुकला रडतांना दिसत आहे. विशेष म्हणजे हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी त्याला ओळखलेलं नाही.परंतु, हा चिमुकला कोणी साधासुद्धा नसून प्रसिद्ध अभिनेता आणि कपूर कुटुंबाचा लेक आहे. हा लहानगा दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता रणबीर कपूर आहे.

रणबीर आज त्याचा ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे तो सध्या चर्चेत आहे. २००७ मध्ये सावरियाँ या सिनेमातून रणबीरने त्याच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. परंतु, १७ वर्षांपूर्वी करिअरला सुरुवात करणाऱ्या रणबीरची पहिली कमाई केवळ २५० रुपये इतकी होती.

सूत्रांच्या माहितीनुसार, रणबीरची पहिली कमाई २५० रुपये इतकी होती. विशेष म्हणजे अथक मेहनत आणि परिश्रम यांच्या जोरावर त्याने ३४५ कोटींची संपत्ती उभी केली आहे. सिनेमा, ब्रँड एंडोर्समेंट यांच्या माध्यमातून तो चांगली कमाई करतो.

दरम्यान, रणबीर कपूर त्याच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा बऱ्याचदा त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत येत असतो. बॉलिवूडचा चॉकलेट  हिरो म्हणून ओळखला जाणारा रणबीर लवकरच अॅनिमल या सिनेमात झळकणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर रिलीज झाला. त्यामुळे तो सध्या चर्चेत आहे. 

टॅग्स :रणबीर कपूरबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा