Join us  

विकी कौशलला भावतात कतरिना कैफच्या या गोष्टी, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 11:46 AM

Vicky Kaushal And Katrina Kaif : विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी नुकताच लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला.

विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांनी अलीकडेच या महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. या जोडप्याने ९ डिसेंबर २०२१ रोजी कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत एका खासगी समारंभात लग्न केले. दोघांनीही एकमेकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या लग्नाला एक वर्ष झाले तेव्हा विकी कौशल भूमी पेडणेकर आणि कियारा आडवाणीसोबत त्याच्या आगामी गोविंदा नाम मेरा चित्रपटाचे प्रमोशन करत होता.

चित्रपट रिलीज होण्यापूर्वी तो आणि कतरिना सुट्टीवर गेले होते, तिथून त्यांनी फोटो शेअर केले होते. कतरिनाने इंस्टाग्राम पोस्टमध्ये सुंदर लोकेशनमधील तिचे फोटो पोस्ट केले आहेत. फिल्मफेअरशी बोलताना विकीने कतरिनाच्या अनेक गोष्टी सांगितल्या. त्याने सांगितले की तो कतरिनातील या गुणांची प्रशंसा करतो आणि त्याचा आदर करतो.

तो म्हणाला, "कतरिना नेहमी म्हणते की जर काही छान बोलता येत नसेल, तर काहीही बोलू नका. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तिला खास बनवतात. ती समजूतदार आहे, ती दयाळू आहे आणि ती तिच्या आजूबाजूच्या लोकांची खूप काळजी घेते. आदर. ही खरोखर कौतुकास्पद बाब आहे. मी असे कोणी पाहिलेले नाही.

विकीचा गोविंदा नाम मेरा हा या वर्षातील एकमेव रिलीज सिनेमा आहे. अभिनेता पुढे मेघना गुलजारच्या सॅम बहादूरमध्ये सान्या मल्होत्रा ​​आणि फातिमा सना शेख यांच्यासोबत दिसणार आहे. २८ जुलै २०२३ रोजी प्रदर्शित होणाऱ्या तृप्ती डिमरी अभिनीत शीर्षक नसलेल्या चित्रपटासाठी तो दिग्दर्शक आनंद तिवारीसोबत पुन्हा एकत्र येणार आहे.

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशल