अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan )आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आपला वाढदिवस (Vidya Balan Birthday ) साजरा करतेयं. १ जानेवारी १९७९ रोजी जन्मलेल्या विद्याचा बॉलिवूड प्रवास अतिशय संघर्षमय राहिला. ‘हम पांच’ या मालिकेत दिसलेली ही मुलगी एकदिवस बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींच्या रांगेत जावून बसेल, असा कुणी विचारही केला नव्हता. पण ही ओळख मिळवणे विद्यासाठी इतके सोपे नव्हतेच. यासाठी तिला बराच संघर्ष करावा लागला.
मुंबईच्या चेंबूर येथे एका तामिळ कुटुंबात विद्याचा जन्म झाला. तिच्या घरात मल्याळम आणि तामिळ अशा दोन्ही भाषा बोलल्या जातात. माधुरी दीक्षित आणि शबाना आझमी यांच्यापासून प्रेरित होऊन मी बॉलिवूडमध्ये जाणार, हे विद्याने अगदी लहानवयातच ठरवून टाकले होते.
विद्याला चित्रपटात यायचे होते. पण हा मार्ग सोपा नव्हता. मल्याळम आणि तामिळ चित्रपटसृष्टीतही विद्याने बरेच प्रयत्न केलेत. पण ती अपयशी ठरली. बंगाली चित्रपट ‘भालो थेको’पासून विद्याला खरी ओळख मिळाली. यानंतर विद्याला ‘परिणीता’ चित्रपट मिळाला आणि विद्याने बॉलिवूडमध्ये पत्तऊल ठेवले. या पहिल्याच चित्रपटासाठी विद्याला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. यानंतर ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘गुरू’,‘सलाम ए इश्क’ यासारख्या अनेक चित्रपटात विद्या दिसली. पण तिला फारसी प्रसिद्धी मिळू शकली नाही.
२००७ मध्ये आलेल्या ‘भूल-भुलैय्या’ या चित्रपटाने मात्र विद्याच्या करिअरला एक वेगळे वळण दिले. यानंतर २००९ मध्ये आलेला ‘पा’ आणि विशाल भारद्वाज यांचा ‘इश्किया’साठी विद्याने सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. यानंतर आलेल्या ‘डर्टी पिक्चर’ने मात्र विद्याला आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत नेऊन बसवले. या चित्रपटातील भूमिकेसाठी विद्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. तिच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला तिची प्रॉपर्टी आणि नेटवर्थ सांगणार आहोत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विद्या बालनची एकूण संपत्ती 18 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास 134 कोटी आहे. ती चित्रपट आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून कमाई करते. तिच्याकडे 14 कोटी रुपयांची एक अपार्टमेंट आहे जी तिच्या पतीने गिफ्ट म्हणून दिला. याशिवाय अभिनेत्रीच्या एका फ्लॅटची किंमत 8 कोटी रुपये आहे. तिच्या संपत्तीमध्ये मर्सिडीज ई-क्लास आणि सेडान सारख्या लग्झरी कार तिच्याकडे आहेत. अभिनेत्रीकडे मर्सिडीज-बेंझ देखील आहे.