छोट्या पडद्यावरील 'लागीर झालं जी' (Lagir Jhala Ji )ही मालिका प्रचंड हिट ठरली होती. आर्मीचे प्रशिक्षण घेणारा अजिंक्य आणि शीतली यांची प्रेमकहाणी रसिकांच्याही पसंतीस पात्र ठरली. मालिकेतील इतर कलाकारांचा अभिनयसुद्धा रसिकांच्या पसंतीस पात्र ठरला होता.मालिकेत भैयासाहेबची तर बातच न्यारी. बोलण्याची अनोखी लकब आणि चेहऱ्यावरील भाव यामुळे भैयासाहेबही घराघरात प्रसिद्ध झाला होता. ही भूमिका साकारली होती अभिनेता किरण गाकवाडने (Kiran Gaikwad).याच मालिकेमुळे त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. यानंतर किरण गायकवाड थेट 'देवमाणूस' बनत रसिकांच्या भेटीला आला.
'देवमाणूस' (Devmanus) या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आणि प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं. मालिकेचा शेवट न दाखवता मालिका संपल्यामुळे रसिकांनीही नाराजी व्यक्त केली होती. मालिकेचा जेव्हा शेवट झाला तेव्हा मालिकेचा दुसरा भाग येणार अशी चर्चा सुरु होती आणि प्रेक्षक आतुरतेने या दुसऱ्या भागाची वाट बघत होते. अखेर 19 डिसेंबरला 'देवमाणूस 2' (Devmanus 2 )मालिकेचा महाआरंभ करण्यात आला.
किरण गाकवाडही पुन्हा रसिकांच्या भेटीला आल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. विशेष म्हणजे सध्या सर्वात जास्त चर्चेत असणारा अभिनेता किरण गायकवाड आहे.मालिकेमुळे त्याचा प्रचंड मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस त्याच्या चाहत्यांच्या संख्येत अजूनही वाढ होत आहे. सोशल मीडियावरही तो प्रचंड प्रसिद्ध असून त्याचा फॉलोअर्सची संख्याही प्रचंड मोठी आहे. त्याचे चाहते त्याच्या खासगी आयुष्याविषयीही जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. किरणचं बालपणही पुण्यातच गेलंय.तसेच लहानपणापासून त्याला अभिनयाची आवड होती.शिक्षण संपल्यानंतर किरण चांगल्या पदावर नोकरी करत होता. पण अभिनयाची ओढ काही त्याला स्वस्त बसू देत नव्हती.
आजारपणामुळे त्याला नोकरी सोडावी लागली आणि तो पुन्हा अभिनयाकडे वळला. मुळात कॉलेजमध्ये असल्यापासून तो एका नाटक ग्रुपमध्ये काम करत होता.'लागीर झालं जी' मालिकेत त्याला काम करण्याची संधी मिळाली. त्याने स्वतःला सिद्ध करुन दाखवलं.भैयासाहेब पात्रही रसिकांच्या तितकंच पसंतीस पात्र ठरलं होतं.आता 'देवमाणूस २' मुळे पुन्हा किरण गायकवाडची चर्चा सुरु झाली आहे.मालिकेच्या पहिल्या भागातही त्याच्या कामाचं सगळीकडूनचं कौतुकही झालं होतं.उत्कृष्ट खलनायक म्हणून किरणला पुरस्कारही मिळाला आहे.