Join us

koffee with karan season 6 : सैफ अली खानने त्याच्या लग्नाच्या दिवशी केली होती ही खास गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 11:51 AM

कॉफी विथ करण ६ या कार्यक्रमात सैफ आणि त्याची मुलगी सारा अली खान नुकतेच झळकले होते. त्यावेळी सैफने त्याच्या आयुष्यातील अनेक गुपिते शेअर केली.

ठळक मुद्देसैफचे करिनासोबत लग्न झाले, त्या दिवशी सैफने त्याची पहिली पत्नी अमृता सिंगसाठी एक पत्र लिहिले होते आणि हे पत्र अमृताला देण्याआधी करिनाला वाचायला दिले होते. सैफ लग्न करून एका नव्या आयुष्याला सुरुवात करणार असल्याने त्याने हे पत्र लिहिले होते. हे सैफने करिनाला वाचायला दिले ही गोष्ट तिला खूप आवडली होती आणि हे पत्र लगेचच अमृताला पाठवावे असे करिनाने त्याला सांगितले होते. करिना नेहमीच प्रत्येक गोष्टीत माझ्या पाठीशी उभी राहिली आहे असे त्याने कॉफी विथ करण या कार्यक्रमात आवर्जून सांगितले.  

करिना कपूर खान आणि सैफ अली खान हे बॉलिवूडमधील एक हॉट कपल मानले जाते. त्यांनी पाच वर्षांच्या अफेअरनंतर १६ ऑक्टोबर २०१२ ला लग्न केले होते. करिनाचे हे पहिले लग्न आहे तर बॉलिवूडचा छोटे नवाब सैफ अली खान याचे करिनाच्या आधी अमृता सिंहसोबत लग्न झाले होते. सैफने लग्नाच्या दिवशी एक अशी गोष्ट केली होती की, यामुळे करिनाला सैफबद्दल असलेला आदर कित्येक पटीने वाढला होता. 

कॉफी विथ करण ६ या कार्यक्रमात सैफ आणि त्याची मुलगी सारा अली खान नुकतेच झळकले होते. त्यावेळी सैफने त्याच्या आयुष्यातील अनेक गुपिते शेअर केली. सैफ अली खान आणि करिना यांच्या लग्नाच्या दिवशी सैफने एक खास गोष्ट केली होती आणि ही गोष्ट काय होती याविषयी त्याने या कार्यक्रमात सांगितले. सैफचे करिनासोबत लग्न झाले, त्या दिवशी सैफने त्याची पहिली पत्नी अमृता सिंगसाठी एक पत्र लिहिले होते आणि हे पत्र अमृताला देण्याआधी करिनाला वाचायला दिले होते. सैफ लग्न करून एका नव्या आयुष्याला सुरुवात करणार असल्याने त्याने हे पत्र लिहिले होते. हे सैफने करिनाला वाचायला दिले ही गोष्ट तिला खूप आवडली होती आणि हे पत्र लगेचच अमृताला पाठवावे असे करिनाने त्याला सांगितले होते. करिना नेहमीच प्रत्येक गोष्टीत माझ्या पाठीशी उभी राहिली आहे असे त्याने कॉफी विथ करण या कार्यक्रमात आवर्जून सांगितले.  

'टशन' सिनेमाच्या सेटवर सैफ करिना भेटले आणि दोघांतली जवळीक वाढू लागली. टशन सिनेमात सैफ, करिनासह अक्षय कुमारसुद्धा होता. त्यावेळी सैफचा स्वभाव करिनाला भावला. महिलांप्रती सैफच्या मनातील आदर पाहून ती त्याच्यावर लट्टू झाली. वयाने सैफ करिनापेक्षा १० वर्षांनी मोठा आहे. पण वयाचा अडसर त्यांच्या प्रेमात आला नाही. केवळ लग्नाaअगोदर करिनाने सैफसमोर एक अट ठेवली होती. सैफ नवाबच्या घराण्यातून होता. सैफशी लग्न करून करिना बेगम बनणार होती. त्यामुळे पैशाची तिला काही कमी नव्हती. मात्र लग्नानंतरही बॉलिवूडमध्ये काम करत राहणार अशी अट तिने सैफपुढे ठेवली. सैफने याला लगेचच होकार दिला आणि दोघे रेशीमगाठीत अडकले. 

टॅग्स :कॉफी विथ करण 6करिना कपूरअमृता सिंगसैफ अली खान