करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोचा 7 वा सीझन ( Koffee with Karan 7) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गुरूवारच्या एपिसोडमध्ये साऊथ सेन्सेशन सामंथा रूथ प्रभु ( Samantha Ruth Prabhu )आणि अक्षय कुमार हे दोघे करणच्या शोमध्ये गेस्ट म्हणून आलेत. नेहमीप्रमाणे या एपिसोडमध्ये धम्माल मस्ती झाली. एकमेकांची मस्करी करणं, एकमेकांना चिमटे काढणं हा प्रकारही झाला. शिवाय काही सीरिअर गोष्टीही झाल्यात. यादरम्यान करण जोहरने सामंथाला तिच्या घटस्फोटाबद्दल विचारलं आणि त्यावर सामंथाने अगदी विचारपूर्वक उत्तरं दिलीत.
चाहत्यांना घटस्फोटाबद्दल माहिती देणं किती कठीण होतं? असा प्रश्न करणने सामंथाला केला. यावर ती म्हणाली, ‘माझ्या चाहत्यांना माझ्या आयुष्याबद्दल सांगण्याचा निर्णय माझा होता. मी त्यांना घटस्फोटाची बातमी दिली आणि त्यानंतर अनेकांनी मला ट्रोल केलं. माझ्यावर टीका केली. पण मी कोणतीही तक्रार करू शकत नव्हती. चाहत्यांनी माझ्यावर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. पण त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नव्हती.’ ‘घटस्फोटानंतरचं आयुष्य कसं होतं? असा प्रश्नही करणने केला. यावर तिने सांगितलं, ‘खरंच खूप कठीण होतं. पण आता सगळं ठीक आहे. आता मी आधीपेक्षा अधिक कणखर झाले आहे.’
एक्स पती समोर आला तर?असा प्रश्न किरणने विचारला. त्यावर ती म्हणाली, ‘समजा आता त्याला आणि मला एका खोलीत बंद केलं तर त्या खोलीतील सगळी तीक्ष्ण गोष्टी लपवून ठेवाव्या लागतील. सध्या तरी असंच आहे. आमच्यात सध्या तरी मतभेद आहेत. पण येणाऱ्या काळात हे मतभेद निवळतील, अशी मला आशा आहे.’
काही वर्ष एकमेकांना डेट केल्यावर 2017 साली सामंथा व नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांचं लग्न झालं होतं. गोव्यात थाटामाटात हे लग्न पार पडलं होतं. जेवढी लग्नाची चर्चा झाली, तेवढीच त्यांच्या हनीमूनचीही चर्चा झाली होती. दोघेही तब्बल 40 दिवस हनीमूनला गेले होते. 40 दिवस जगातील वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत त्यांनी हनीमून एन्जॉय केलं होतं. चार वर्ष दोघांचाही सुखात संसार सुरू होता. पण गेल्या वर्षभरात दोघांमधील मतभेद वाढले होते. याचीच परिणीती अखेर घटस्फोटात झाली.