बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर(Karan Johar)चा सर्वात लोकप्रिय शो 'कॉफी विद करण' (Koffee with karan 8) चर्चेत आला आहे. यंदाचा सीझन खूप मजेशीर आहे. शोमध्ये सेलिब्रेटी आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफशी संबधित खुलासा करताना दिसत आहेत. आता शोच्या पुढच्या भागात करण जोहरच्या दोन खास पाहुण्या राणी मुखर्जी (Rani Mukherji) आणि काजोल (Kajol) दिसणार आहेत.
कॉफी विद करण' 8 मध्ये बीटाऊमधील लोकप्रिय बहिणी येणार अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होतीच. 'कुछ कुछ होता है' फेम टीना म्हणजेच राणी मुखर्जी आणि अंजली म्हणजेच काजोल शोमध्ये गप्पा मारणार असून धमाल येणार आहे. यादरम्यान करण जोहरने सांगितलं की कुछ कुछ होता है च्या शूटिंग दरम्यान त्याने राणी मुखर्जीच्या खाण्या पिण्यावर निर्बंध लावले होते.
'कुछ कुछ होता है'च्या शूटिंगच्या दिवसांची आठवणींना उजाळा देताना करण जोहर म्हणाला, 'मी राणीला सांगितले की मॉरिशसमध्ये तिला शॉर्ट स्कर्ट घालावा लागणार आहे त्यामुळे तिने थोडे वजन कमी करावे. तिने सांगितले की मी 4-5 किलो कमी करेन. पण तिचं वजन कमी न होता ते वाढले होते. मी विचार करत होतो की ती केशरी रंगाचा शर्ट आणि स्कर्ट कसा घालेल? करण पुढे सांगतो की, राणीचे वजन कमी करण्यासाठी त्याने रूम सर्व्हिसला सूचना दिल्या होत्या की राणी मुखर्जीला कोणीही जेवण देणार नाही.
करण जोहरने पुढे खुलासा केला की, राणीला जेवण न देण्याच्या निर्णयात अभिनेत्रीची आई कृष्णा देखील त्याच्यासोबत होती. एके दिवशी राणी मुखर्जी नाश्ता करत असताना करणने तिच्या हातातून नाश्त्याची प्लेट हिसकावून घेतली. करणने राणीला सांगितले, तू हे खाऊ शकत नाहीस. हा एपिसोड खूपच खास असणार आहे हे दिसून येतंय. चाहते एपिसोडची आतुरतेने वाट पाहत आहेत.