Join us

Koffee With Karan Season 8: अनन्या पांडेनं दिली नात्याबाबतची कबुली, करण जोहरसमोर आलिया-करीनाने केले खुलासे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 3:34 PM

Koffee With Karan Season 8: करण जोहरच्या कॉफी विथ करण सीझन ८च्या आगामी भागात बरेच कलाकार दिसणार आहेत.

सध्या करण जोहरचा सर्वात लोकप्रिय टॉक शो कॉफी विथ करण सीझन ८ बॉलिवूड वर्तुळातील चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. बॉलिवूडचे पॉवर कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी या शोचे उद्घाटन केले. यानंतर या शोमध्ये बॉलिवूड बंधू जोडी सनी पाजी आणि त्याचा भाऊ बॉबी देओल दिसले. आता या शोमध्ये इतर कोणते स्टार्स सहभागी होणार आहेत आणि हे सेलिब्रिटी त्यांचे कोणते वैयक्तिक सीक्रेट उघड करणार आहेत? करण जोहरच्या कॉफी विथ करण सीझन ८च्या आगामी भागात बरेच कलाकार दिसणार आहेत.

कॉफी विथ करण सीझन ८च्या नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमो व्हिडिओमध्ये अनन्या पांडे आणि सारा अली खान एकत्र दिसणार आहेत. या प्रोमोमध्ये करण साराला विचारतो की अनन्या पांडेकडे काय आहे जे तुझ्याकडे नाही? याला उत्तर देताना सारा अली खान म्हणाली की, द नाईट मॅनेजर.

हे उत्तर ऐकून अनन्या पांडे लाजली आणि म्हणते की मला अनन्या कॉय कपूर सारखे वाटत आहे. ती आदित्य रॉय कपूरला डेट करत असल्याची ही एक छोटाशी हिंट दिली. नुकताच तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ती तिचा कथित बॉयफ्रेंड आदित्य रॉय कपूरसोबत मालदीवच्या सुट्टीवर गेली होती.

नणंद-भावजय करणार धमालमस्तीकॉफी विथ करण सीझन ८ची पाहुण्यांची यादी खूपच रोमांचक आहे. बॉलिवूडचे नणंद-भावजय जोडपे म्हणजेच करीना कपूर खान आणि आलिया भट आगामी एपिसोडमध्ये एकत्र दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय रोहित शेट्टी आणि अजय देवगण ही दमदार जोडीही यावेळी 'कॉफी विथ करण'मध्ये सहभागी होणार आहे. यासोबतच काजोल आणि राणी मुखर्जी 'कॉफी विथ करण'मध्येही एकत्र दिसणार आहेत. 

 

टॅग्स :कॉफी विथ करण 6करण जोहरअनन्या पांडेसारा अली खानकरिना कपूरआलिया भट