Join us

‘कोण होणार करोडपती’च्या हॉटसीटवर बसणार मेधा पाटकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 19:15 IST

Kon honar crorepati: मेधा पाटकर त्यांच्या जीवनात आलेले अनुभव आणि समाजकार्य करतानाच्या काही आठवणी प्रेक्षकांसोबत शेअर करणार आहेत.

ठळक मुद्देसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या शोमध्ये हजेरी लावली आहे.

काही दिवसांपूर्वीच छोट्या पडद्यावर 'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम सुरु झाला आहे. सामान्य माणसाला त्याच्या सामान्य ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याचं स्वप्न दाखवणारा हा शो सध्या लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. त्यामुळे उभ्या महाराष्ट्रातून या शोला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या शोमध्ये हजेरी लावली आहे. त्यातच आता ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर आणि समाजसेवक मतीन भोसले यावेळी कोण होणार करोडपतीच्या हॉटसीटवर बसणार आहेत. 

सामान्य माणसासाठी सतत झटणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर आणि समाजसेवक मतीन भोसले हे येत्या १८ सप्टेंबर रोजी कोण होणार करोडपतीच्या कर्मवीर विशेष भागात सहभागी होणार आहेत. यावेळी मेधा पाटकर त्यांच्या जीवनात आलेले अनुभव आणि समाजकार्य करतानाच्या काही आठवणी प्रेक्षकांसोबत शेअर करणार आहेत. मेधा पाटकर सहभागी होत असलेला कर्मवीर विशेष भाग हा यंदाच्या पर्वातील शेवटचा भाग आहे.

कर्मवीर विशेष भाग म्हणजे काय?

कर्मवीर विशेष भागामध्ये काही सेलिब्रिटी स्पर्धक सहभागी होऊन ते सामाजातील गरजू घटकांसाठी खेळतात व जिंकलेली रक्कम त्यांना मदत म्हणून देऊ करतात. त्यामुळे आता मेधा पाटकर नेमकं कोणासाठी खेळणार हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. 

टॅग्स :मेधा पाटकरसचिन खेडेकरसेलिब्रिटीटिव्ही कलाकार