संगीत सम्राट पर्व दुसरे मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील होतकरू गायक आणि संगीतकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ 'संगीत सम्राट पर्व २' ने उपलब्ध करून दिले. दुसऱ्या पर्वाला देखील प्रेक्षकांचे प्रेम आणि उदंड प्रतिसाद दिला. पर्व २ मध्ये कार्यक्रमाच्या रुपरेषेत काही बदल देखील करण्यात आले होते. नादमधुर सह्याद्री, स्वरमय कोकण, सूरसाज विदर्भ आणि लयदार मराठवाडा या टीम्स आणि त्यांचे कॅप्टन्स सावनी रवींद्र, जुईलीजोगळेकर, राहुल सक्सेना आणि अभिजीत कोसंबी हे कार्यक्रमात रंगत आणली. नुकतंच या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला आणि संगीत सम्राट पर्व २चे विजेतेपद कोकण कन्या या टीमने पटकावले.
कॅप्टन जुईली जोगळेकरची टीम 'स्वरमय कोकण' आणि त्यातील स्पर्धक यांनी नेहमीच परीक्षकांची दाद आणि प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं. स्पर्धा अटीतटीची असली तरी या स्पर्धकांनी नेहमीच सर्वांकडून वाहवा मिळवली. कोकण कन्याटीम कधीच डेंजर झोन मध्ये नाही आली, त्यांनी नेहमीच चांगला परफॉर्मन्स दिला आणि परीक्षकांची प्रतिक्रिया नेहमीच लक्षात ठेवून आपला परफॉर्मन्स अधिकाधिक उत्तम बनवला. कोकणकन्या टीम कधीच कुठला चॅलेंज हरली नाही.
विजेता टीमची कॅप्टन जुईली जोगळेकर म्हणाली, "कोकण कन्या ही टीम माझी खूप आवडती आहे. त्यांची स्वतःच्या परफॉर्मन्समध्ये सुधारणा करून नेहमी अधिकाधिक उत्तम परफॉर्म करण्याची जिद्द मला आवडते आणि अशी मेहनती मुलं आजकाल खूप कमी पाहायला मिळतात. परीक्षकांकडून त्यांना मिळणाऱ्या प्रतिक्रियांवर ते नेहमी लक्ष देत असत. मला असं वाटतं त्यांचा आत्मविश्वासच त्यांना सर्व स्पर्धकांपासून वेगळं ठरवतो. मला कुठेतरी वाटत होते कि कोकण कन्याच जिंकेल आणि ते खरं ठरलं. ते या विजेतेपदासाठी अगदी योग्य आहेत आणि ते भविष्यातदेखील असंच छान परफॉर्म करतील आणि अशाच ट्रॉफी घरी घेऊन जातील."