क्रांती रेडकरला समीर वानखेडेंमध्ये दिसते 'बाहुबली'ची झलक; Video केला रिट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 12:41 PM2021-11-08T12:41:35+5:302021-11-08T12:42:14+5:30
kranti redkar : नवाब मलिक करत असलेल्या या आरोपांवर समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकर ट्विटरच्या माध्यमातून त्यांना प्रत्युत्तर देत आहे. त्यामुळे सध्या या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री क्रांती रेडकर (kranti redkar) तिचे पती आणि एनसीबीचे झोनल ऑफिसर समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्यामुळे चर्चेत येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक करत असलेल्या या आरोपांवर समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकर ट्विटरच्या माध्यमातून त्यांना प्रत्युत्तर देत आहे. त्यामुळे सध्या या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. विशेष म्हणजे याच गोंधळात आता क्रांतीने ट्विटरवर समीर वानखेडेंचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून ती समीर वानखेडे यांना 'बाहुबली' म्हणत असल्याचं दिसून येत आहे.
अलिकडेच क्रांतीने ट्विटरवर एक व्हिडीओ रिट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये समीर वानखेडे याच्या फोटोंचा कोलाज करण्यात आला आहे. सोबतच व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला बाहुबली चित्रपटातील गाणं सुरु आहे. इतंकच नाही तर या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये नवाब मलिक यांच्यावर पुन्हा निशाणा साधण्यात आला आहे.
Nawab Malik is getting confused in his own statements what are he is saying today's conference some different false statements
— रिदानशि ( ਪ੍ਰਦੀਪਜੀਵੀ ) 🇮🇳 (@Rydanshi) November 7, 2021
We strongly stand with #SameerSir and his family
#SameerWankhede@KrantiRedkar@jasmeen23_
Trend activitie👇#StandWithSameerWankhedepic.twitter.com/Wa0yaQO36S
"नवाब मलिक हे त्यांनीच केलेल्या वक्तव्यांमध्ये गोंधळून गेले आहेत.आजच्या परिषदेत ते काय बोलत आहेत? काही खोटी कारणं देत आहेत. आम्ही समीर सर आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत", असं कॅप्शन हा व्हिडीओ शेअर करताना देण्यात आलं आहे. हाच व्हिडीओ क्रांतीने रिट्विट केला आहे.
दरम्यान, गेल्या कित्येक दिवसांपासून क्रांती रेडकर नवाब मलिक यांच्यावर थेट टीकास्त्र डागत आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावरुन समीर वानखेडे निर्दोष असल्याचं सांगत आहे. यापूर्वीदेखील तिने समीर वानखेडे यांना पाठिंबा देणारं एक ट्विट केलं होतं. मात्र, या ट्विटमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.