Join us

कृष्णाने उभा केला ‘नमस्ते लंडन’ चित्रपटातील प्रसंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2019 7:15 AM

‘कृष्णा चली लंडन’ या मालिकेचा विषय हा काळाच्या पुढे असून आपल्या कथानकाद्वारे त्यात सामाजिक विषयांना स्पर्श केला जातो. कथानकाच्या सध्याच्या भागात या मालिकेने देशभक्तीचा विषय हाताळला आहे.

‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ या मालिकेतील राधे (गौरव सरीन) आणि कृष्णा (मेघा चक्रबोर्ती) हे लंडनमध्ये राहण्याचे आपले स्वप्न सध्या प्रत्यक्षात अनुभवत आहेत. या मालिकेचा विषय हा काळाच्या पुढे असून आपल्या कथानकाद्वारे त्यात सामाजिक विषयांना स्पर्श केला जातो. कथानकाच्या सध्याच्या भागात या मालिकेने देशभक्तीचा विषय हाताळला आहे.

या मालिकेच्या आगामी भागांतील एका प्रसंगात कृष्णा स्थलांतरण केल्याची अधिकृत कागदपत्रे नसल्यामुळे एका भारतीय रुग्णावर उपचार करण्यास नकार देणार्‍्या डॉ. वीरला चार गोष्टी सुनावताना दिसेल. या प्रसंगाबद्दल मेघा चक्रबोर्ती म्हणाली, “नेहमीच काहीतरी नवं आणि विद्यमान परिस्थितीशी संदर्भ राखणारे प्रसंग सादर करणार्‍्या एका मालिकेत मी भूमिका सकारीत असल्याचा मला अतिशय आनंद वाटतो. या मालिकेच्या आगामी भागात कृष्णावर एक राष्ट्रभक्तीपर प्रसंग चित्रीत केला गेला आहे. 

प्रसंग उभा करताना मी नमस्ते लंडन या चित्रपटातील अशाच प्रकारच्या एका प्रसंगावरून प्रेरणा घेतली आहे. त्या चित्रपटात भारतावर टीका करून भारताचा अपमान करणार्‍या  इंग्रज अधिका-यांचा प्रतिवाद करण्यासाठी अक्षयकुमार जसा उभा राहतो, त्याप्रमाणेच एका भारतीय व्यक्तीवर उपचार करण्यास नकार देणा-याा डॉ. वीरशी कृष्णा बिनतोड युक्तिवाद करून त्याचे तोंड बंद करते. हा प्रसंग उभा करताना मला अतिशय उत्साह वाटत होता आणि प्रेक्षकांना तो प्रसंग पाहताना छान वाटेल, अशी अपेक्षा आहे.”

‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ ही मालिका पुरोगामी विचार मांडणारी असून आजुबाजूच्या परिस्थितीचे वास्तव दर्शन घडविणारी मालिका आहे. परदेशात असताना आपल्या देशाची उघड बाजू घेणार्‍्या कृष्णाला पाहताना प्रेक्षकांच्या अंगावर देशभक्तीचा काटा फुलेल. 

टॅग्स :कृष्णा चली लंडन