Join us

टायगरच्या बहिणीने पार केल्या सगळ्या मर्यादा... चक्क त्या अवस्थेत टाकला बॉयफ्रेंडसोबतचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 15:51 IST

कृष्णाने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर नुकताच हा फोटो पोस्ट केला आहे.

ठळक मुद्देकृष्णाने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर बॉयफ्रेंडला किस करतानाचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोसोबत तिने समुद्रातील माझा आवडता मासा... असे कॅप्शन लिहिले आहे.

टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ सध्या तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून कृष्णा श्रॉफ साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर नजर टाकली तरी तिचे बॉयफ्रेंडसह अनेक रोमँटिक फोटो आपल्याला पाहायला मिळतात. लग्नाआधीच हे दोघे व्हॅकेशन एन्जॉय करत असल्याचे या फोटोंमधून पाहायला मिळते. सतत ते दोघांचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात आणि हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील होतात.

आता तर कृष्णाने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर बॉयफ्रेंडला किस करतानाचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोसोबत तिने समुद्रातील माझा आवडता मासा... असे कॅप्शन लिहिले आहे. कृष्णाचा हा फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून 50 हजारांहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक केले आहे. तसेच अनेकांनी कमेंट करत तुमची जोडी खूपच छान दिसते असे सांगितले आहे. 

काही महिन्यांआधीच कृष्णाने तिचा टॉपलेस फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. त्यानंतर तिने तिच्या हॉट फोटोंचा सपाटाच लावला. आता तर ती नेहमीच तिचे बोल्ड फोटो पोस्ट करत असते. 

कृष्णाने काही दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या या फोटोत तिने बिकनी घातली असून तिचा हॉट अंदाज आपल्याला पाहायला मिळाला होता. हा फोटो पोस्ट करत कृष्णाने लिहिले होते की, तू मला नेहमीच खळखळून हसवतो. माझ्या बेस्ट फ्रेंडसोबत या वर्षांत माझी ओळख झाली. हे वर्षं माझ्यासाठी खूपच छान होते. 

कृष्णाचा सेक्सी अंदाज सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. एकंदरीतच काय तर सध्या चंदेरी दुनियेच्या झगमगाटापासून दूर राहिलेल्या कृष्णाचा रूपेरी पडद्यावर नसला तरी सोशल मीडियावर बोलबाला आहे हे मात्र नक्की.

टॅग्स :कृष्णा श्रॉफटायगर श्रॉफ