Join us

लॉकडाऊनदरम्यान या प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी झाली अधिक बोल्ड, शेअर केला सेक्सी लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 10:46 IST

कृष्णा श्रॉफने बेडवर बसून मिररमध्ये हा सेल्फी घेतला असून तिच्या या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

टायगर श्रॉफची बहीण कृष्णा बॉलिवूडपासून लांब असली तरी ती सोशल मीडियावर तुफान हिट ठरते. दिवसेंदिवस ती तिचे अनेक सेक्सी लूक फोटो शेअर करत असते. त्यामुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ होत असून तिचे फोटो पाहण्यासाठी अनेकजण तिच्या सोशल मीडियापेज पाहत असतात. कृष्णा फक्त स्वतःचेच नाहीतर तिच्या बॉयफ्रेंडसह तिने घालवेला रोमँटीक क्षणही शेअर करते. आता कृष्णाने इन्स्टाग्रामवर तिचा एक बिकनी फोटो पोस्ट केला आहे. तिने बेडवर बसून मिररमध्ये हा सेल्फी घेतला असून तिच्या या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. कृष्णा या फोटोत खूपच बोल्ड आणि सेक्सी पाहायला मिळते आहे. कृष्णाच्या काळ्या रंगातील बिकनीतील बोल्ड लूकची चर्चा फार रंगली आहे. 

हा फोटो पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. हा फोटो शेअर होताच नेटीझन्सने तिला विविध कमेंट केल्याचे पाहायला मिळत आहे. काहींनी तर तिला काही कपडे घालून क्वॉरंटाईन टाईम एन्जॉय करत असे म्हटले आहे तर काहींनी, कोई इसे एक जोडी कपडे दे दो असे कमेंट केले आहे तर काहींनी कपडे बहोत कम है बेचारी के पास, जब भी इसे देखा ऐसेही देखा असे म्हणच खिल्ली उडवत आहेत. मात्र या गोष्टीचा कृष्णाला फरक पडत नाही. तिचे असे फोटो ती शेअर करत असते आणि सा-यांचे लक्ष वेधून घेत असते. 

 कृष्णा भावाप्रमाणेच  फिटनेस फ्रिक आहे. इन्स्टाग्रामवर कृष्णा सुद्धा फिटनेसबाबतचे व्हिडिओ पोस्ट करत असते. तुर्तास कृष्णाच्या या अंदाजातील फोटोंनी सोशल मीडियावर  आग लावली आहे.

टॅग्स :कृष्णा श्रॉफजॅकी श्रॉफ