'भूल भुलैया २' या त्याच्या शेवटच्या चित्रपटापासून कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा हिंदी चित्रपटसृष्टीतील नव्या पिढीचा हिरो नंबर वन बनला आहे. त्याच्या चित्रपटांचा यशाचा दरही थक्क करणारा आहे. आता कार्तिक आर्यनही त्याच्या 'शहजादा' (Shehzada) या नव्या चित्रपटातून निर्माता म्हणून पदार्पण करतो आहे. निर्माता होण्याच्या प्रश्नावर कार्तिक आर्यन म्हणाला, 'काही परिस्थिती अशा होत्या की मला चित्रपटाचा निर्माता व्हावं लागलं, पण मी स्वत:ला चित्रपटाचा अभिनेता मानतो आणि मी अभिनेता म्हणून आनंदी आहे.' या ट्रेलर लाँचवेळी क्रिती सनॉन(Kriti Sanon)नं चाहत्यांना असा काही प्रश्न विचारला जो ऐकून कार्तिक आर्यन कावराबावरा झाला होता.
'शहजादा' हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या अल्लू अर्जुनच्या तेलगू चित्रपट 'अला वैकुंठापुरमुलू'चा रिमेक आहे. या चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी मुंबईतील गेटी थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला. गेल्या वेळी याच ठिकाणी हृतिक रोशनच्या 'विक्रम वेधा' चित्रपटातील अल्कोहोलिया गाणे प्रदर्शित झाले होते. ट्रेलर पाहता, 'शहजादा' हा संपूर्ण गोविंदा स्टाईल मसाला चित्रपट आहे. आणि, कार्तिक आर्यन जेव्हा गोविंदा स्टाईलमध्ये गेटी थिएटरमध्ये दाखल झाला, तेव्हा त्याचेही बॅण्डसह स्वागत करण्यात आले. मंचावर आल्यावर मुकूट परिधान करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
ट्रेलर लाँचदरम्यान क्रिती सनॉनने चाहत्यांना विचारले की, आम्ही दोघे एकत्र चांगले दिसतोय का? त्यावर चाहत्यांनी हो असं उत्तर दिलं. मात्र क्रिती सनॉनचा हा प्रश्न ऐकून कार्तिक लाजून कावराबावरा झाला होता. या चित्रपटाबद्दल क्रिती सनॉन म्हणाली, 'बर्याच दिवसांनी मी 'शहजादा' चित्रपटात ग्लॅमरस भूमिकेत दिसणार आहे. पूर्वीचे चित्रपट कौटुंबिक मूल्यांवर बोलायचे जे चित्रपटांमध्ये दिसणे बंद झाले होते, ते या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट १० फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे, त्यामुळे आम्ही चार दिवस अगोदर व्हॅलेंटाईन डे साजरा करू.
यावेळी कार्तिक आर्यन म्हणाला, 'मी गर्दीतून बाहेर पडलेला माणूस आहे आणि मी पहिल्यांदाच असा चित्रपट करत आहे. 'भूल भुलैया २' मध्ये मी पहिल्यांदा हॉरर कॉमेडी केली, ज्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, मला आशा आहे की प्रेक्षक माझ्या आधीच्या 'भूल भुलैया २' या चित्रपटाला दिलेले प्रेम या चित्रपटालाही देतील. 'लुका छुपी' चित्रपटानंतर क्रिती सेनॉन आणि कार्तिक आर्यनची जोडी 'शहजादा'मध्ये चार वर्षांनी कमबॅक होत आहे.