बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनने 'हिरोपंती' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. या चित्रपटानंतर ती अनेक बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकली. नुकताच तिचा 'लुका छुपी' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिच्यासोबत बॉलिवूडचा हॅण्डसम हंक कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता क्रिती 'अर्जुन पटियाला' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत दलजित दोसांझ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहिर करण्यात आली आहे. येत्या २९ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी 'अर्जुन पटियाला' या चित्रपटाची नवी तारीख ट्विटरवर जाहीर केली आहे. त्यांनी ट्विट केले की, 'अर्जुन पटियाला चित्रपटाची नवी तारीख. चित्रपट १९ जुलै, २०१९ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दलजित दोसांझ, क्रिती सेनॉन व वरूण शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित जुगराजने केले आहे. तर निर्मिती भूषण कुमार, क्रिष्णन कुमार, दिनेश विजान व संदीप ल्येझेन यांनी केली आहे.'