Join us

गोविंदाच्या पायाला गोळी लागली, वाद विसरून कश्मिराने सासऱ्याला भेटायला गाठलं हॉस्पिटल, व्हिडिओ समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 3:43 PM

बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची बातमी समोर आली होती. स्वत:च्याच लायसन्स बंदूकीतून त्याला गोळी लागली. गोंविदासोबत घडलेल्या या दुर्घटनेबाबत समजताच अभिनेत्याचा भाचा कृष्णा अभिषेक याची पत्नी कश्मिरा शाहने लगेचच रुग्णालयात धाव घेतली.

बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची बातमी समोर आली होती. आज पहाटे पावणे पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. स्वत:च्याच लायसन्स बंदूकीतून त्याला गोळी लागली. रिव्हॉल्वरचे लॉक खुलं असल्याने चुकून गोळी लागल्याचं अभिनेत्याने सांगितलं. त्यानंतर गोविंदाला तातडीने अंधेरीतील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अभिनेत्याच्या पायातील गोळी काढली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

गोंविदासोबत घडलेल्या या दुर्घटनेबाबत समजताच अभिनेत्याचा भाचा कृष्णा अभिषेक याची पत्नी कश्मिरा शाहने लगेचच रुग्णालयात धाव घेतली. कौंटुबिक वाद विसरून कश्मिरा गोविंदाला भेटायला गेली. याचा व्हिडिओ इन्स्टंट बॉलिवूडच्या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. सध्या कृष्णा अभिषेक ऑस्ट्रेलियात आहे. तर गोविंदाची पत्नी सुनिता अहुजादेखील कोलकाताला आहे. 

गोविंदाच्या मॅनेजरने एएनआयला दिलेल्या माहितीनुसार,  गोविंदा पहाटेच एका कार्यक्रमासाठी कोलकत्याला जाणार होता. तयार होत असताना त्याने त्याची लायसन्स रिव्हॉल्व्हर कपाटात ठेवण्यासाठी हातात घेतली. मात्र ती चुकून हातातून खाली पडली. रिव्हॉल्वरचं लॉक खुलं राहिल्याने त्याच्या पायाला गोळी लागली. त्याला लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याचे कुटुंबीय रुग्णालयात आहेत. डॉक्टरांनी गोळी काढली असून आता तो सुखरुप आहे, काळजी करण्याचं कारण नाही अशी माहिती समोर आली आहे. सध्या तो रुग्णालयातच उपचार घेत आहे.

टॅग्स :गोविंदाकृष्णा अभिषेकसेलिब्रिटी