Join us

कुशलच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचली पत्नी, मीडियाने घेरले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 10:01 AM

शनिवारी कुशलच्या अंत्यदर्शनाला छोट्या पडद्यावरील त्याच्या अनेक मित्रमैत्रिणींनी हजेरी लावली. कुशलला अखेरचे पाहण्यासाठी त्याची पत्नी Audrey Dolhen ही सुद्धा पोहोचली. 

टीव्हीचा लोकप्रिय चेहरा कुशल पंजाबीने अवघ्या वयाच्या 37 व्या वर्षी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. कुशलने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीतील स्टार्स आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. शनिवारी कुशलच्या अंत्यदर्शनाला छोट्या पडद्यावरील त्याच्या अनेक मित्रमैत्रिणींनी हजेरी लावली. त्याच्या मित्रमैत्रिणींना यावेळी अश्रू आवरत नव्हते. कुशलला अखेरचे पाहण्यासाठी त्याची पत्नी Audrey Dolhen ही सुद्धा पोहोचली. 

विरल भयानी यांनी इन्स्टाग्रामवर कुशल पंजाबीच्या अंत्ययात्रेचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. कुशलच्या अंत्ययात्रेला त्याची पत्नी पोहोचल्याचा दावा या व्हिडीओद्वारे केला जात आहे. कारमध्ये कुशलची पत्नी बसलेली आहे. मात्र तिने चेहरा ओढणीने झाकलेला दिसतोय. मीडियाच्या कॅमे-यांपासून स्वत:चा बचाव करताना ती यात दिसतेय. Audrey Dolhen गाडीला मीडियाच्या कॅमे-यांनी घेरेलेलेही दिसतेय. अनेक प्रयत्नानंतर ही कार गर्दीतून बाहेर पडली. 

कुशल पंजाबी याच्या कुटुंबात त्याची यूरोपीयन पत्नी आणि मुलगा कियान आहे. ते दोघेही सध्या शंघाईमध्ये राहत आहे. 4 वर्षांपूर्वी म्हणजेच नोव्हेंबर 2015 ला कुशलनेफान्सच्या बीचवर भारतीय पद्धतीने लग्न केले होते. कुशल मुलावर प्रचंड प्रेम करायचा. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर मुलासोबतचा फोटो शेअर केला होता. इन्स्टा स्टोरीवर त्याने मुलाचा फोटो शेअर करत सोबत हार्ट शेप इमोजी पोस्ट केला होता. ही त्याची अखेरची पोस्ट होती. कुशल व त्याची पत्नी गत तीन वर्षांपासून विभक्त राहत होते. यामुळे कुशल डिप्रेशनमध्ये असल्याचे मानले जात आहे. कुशल पंजाबीचा मित्र चेतन हंसराज याने कुशलने नैराश्यापोटी आत्महत्या केल्याचे कन्फर्म केले आहे.  

कुशलचे आईवडील त्याच्या निधनाच्या आदल्या दिवशी आपल्या मुलाशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. पण कुशलचा फोन बंद येत होता. रात्र झाली तरी कुशलशी संपर्क होत नव्हता. कुशलचे आईवडील रात्री 10.30 वाजता तो राहत असलेल्या बिल्डींगमध्ये पोहोचले. त्यावेळी तो घरात एकटा होता.

दरवाज्याची बेल वाजवल्यावरही तो प्रतिसाद देत नसल्याने आईवडिलांनी दरवाजा तोडला असता आत कुशलचा मृतदेह पंख्याला लटकलेला होता. कुशलने सुसाईड नोटमध्ये आत्महत्या करत असल्याचे नमूद केले असून या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार ठरवू नये, असेही त्याने यात लिहिले आहे.

टॅग्स :कुशल पंजाबी