वडिलांच्या आठवणीत भावूक झाला रोहित शेट्टी, म्हणाला - 'त्यांच्या निधनानंतर घरची परिस्थिती...'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 12:10 PM2023-12-21T12:10:27+5:302023-12-21T12:16:35+5:30
'कॉफी विथ करण सीझन 8' कार्यक्रमात दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अभिनेता अजय देवगण यांनी हजेरी लावली.
बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर सध्या त्याच्या कॉफी विथ करण या टॉक शोमुळे चर्चेत येत आहे. सध्या या शोचं 8 वं पर्व सुरु असून आतापर्यंत अनेक कलाकारांनी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे या शो मुळे अनेक कलाकारांच्या खासगी जीवनातील काही रंजक किस्से उलगडले गेले आहेत. त्यामुळे या शोला प्रेक्षक कायम पसंतीत देतात. लेटेस्ट एपिसोडमध्ये दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अभिनेता अजय देवगण यांनी हजेरी लावली. यावेळी ते बॉलिवूड आणि वैयक्तिक आयुष्याविषयी दिलखुलासपणे बोलताना दिसत आहेत.
रोहित शेट्टीला ब्लॉकबास्टर सिनेमे देणार दिग्दर्शक म्हणून ओळखलं जातं. मात्र, त्याच्या आव्हानात्मक प्रवासाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. करणच्या शोमध्ये वडिलांच्या निधनानंतर घरची परिस्थिती कशी बदलत गेली यावर भाष्य केलं. रोहित शेट्टी म्हणाला, 'माझे वडील एक प्रसिद्ध स्टंटमन होते. जेव्हा मी 8 वर्षांचा होता. तेव्हा त्यांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर कुटुबांवर आर्थिक संकट कोसळले होते'.
पुढे तो म्हणाला, ' मी लहान होतो. कुटुंबाची जबाबदारी माझ्या आईने सांभाळली. तिने चित्रपटांमध्ये कनिष्ठ कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली'. वडिलाबद्दल बोलताना तो म्हणाला, ते वयाच्या १२-१३व्या वर्षी मुंबईत आले. कॉटन ग्रीनमध्ये वेटर म्हणून काम केल्यानंतर त्याने सुरुवातीला बॉडीबिल्डिंग आणि बॉक्सिंगमध्ये रस घेतला. यानंतर कोणीतरी त्यांना चित्रपटात नशीब आजमावण्याचा सल्ला दिला होता'.
'कॉफी विथ करण 8'च्या मंचावर आतापर्यंत दीपिका पादुकोण-रणवीर सिंह, सनी देओल-बॉबी देओल, सारा अली खान- अनन्या पांडे, काजोल-राणी, करीना-आलिया वरुण-सिद्धार्थ आणि अर्जुन- आदित्य यांनी हजेरी लावली आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षक ‘कॉफी विथ करण’चे सगळे भाग पाहू शकतात.