Join us

सध्या कुठे आहे, काय करते ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’मधील ‘तुलसी वीरानी’ची सासूबाई?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2021 7:00 AM

‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेतील सर्वच पात्र तुफान लोकप्रिय झालीत. मग ते तुलसी विरानीचं पात्र असो किंवा मग तुलसीच्या सासूचं पात्र असो...

ठळक मुद्देअपरा आज कुठे आहेत तर आजही टीव्ही इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. अपरा यांनी अनेक चित्रपटांतही वेगवेगळ्या भुमिका साकारल्या आहेत.

‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ (Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi )या छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय मालिकेला नुकतीच 21 वर्ष पूर्ण झाली. 2000 साली टीव्हीवर प्रसारित झालेली ही मालिका एकता कपूरची सर्वाधिक यशस्वी मालिका म्हणून ओळखली जाते. या मालिकेतील सर्वच पात्र तुफान लोकप्रिय झालीत. मग ते अभिनेत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी साकारलेलं तुलसी विरानीचं पात्र असो किंवा मग अपरा मेहता (Apara Mehta) यांनी साकारलेलं तुलसीच्या सासूचं पात्र असो. याच अपरा मेहरा यांच्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अपरा मेहता यांनी टेलिव्हिजनवर अनेक शो केलेत. आई आणि सासूच्या भूमिकांसाठी त्या खास ओळखल्या जातात.  ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेनं त्यांना एक वेगळी ओळख दिली. सावित्री वीरानीची व्यक्तिरेखा त्यांनी अशी काही जिवंत केली की, आजही अनेक लोक त्यांना याच नावाने ओळखतात. अपरा मेहता यांनी प्रोफेशनल लाईफमध्ये प्रचंड यश मिळवलं. पण पर्सनल लाईफबद्दल बोलायचं तर पर्सनल लाईफमध्ये त्यांनी  अनेक चढउतार पाहिले.

अपरा मेहरा यांनी एकदा नाही तर दोनदा लग्नं केलं. ते सुद्धा एकाच व्यक्तिसोबत. होय, 1980 साली अपरा यांनी दर्शन जरीवाला यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. पुढच्या वर्षी 1981 मध्ये दोघांनी पुन्हा लग्नगाठ बांधली. दोघांचंही लग्न धूमधडाक्यात व्हावं, अशी त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा होती. याच इच्छेखातर दोनदा लग्न झालं. लग्ना दर्शन 21 वर्षांचे होते तर अपरा 18 वर्षांच्या.आज अपरा व दर्शन दोघंही परस्परांपासून विभक्त झाले आहेत. दोघांनी घटस्फोट घेतलेला नाही. पण आता हे जोडपं एकमेकांसोबत राहत नाही. मतभेदांमुळे दोघांच्या नात्यात दुरावा आला तो कायमचाच. दोघांना कुशाली नावाची एक मुलगी आहे. ती अपरा यांच्यासोबत राहते.

अपरा व दर्शन विभक्त झाले असले तरी आजही परस्परांबद्दल त्यांच्या मनात अपार आदर आहे. अपरा एका मुलाखतीत यावर बोलल्या होत्या. आम्ही चांगले मित्र होतो आणि राहू, असे त्या म्हणाल्या होत्या.अपरा आज कुठे आहेत तर आजही टीव्ही इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. अपरा यांनी अनेक चित्रपटांतही वेगवेगळ्या भुमिका साकारल्या आहेत.

टॅग्स :स्मृती इराणीटेलिव्हिजन