भारतीय टेलिव्हिजनवर अनेक वर्षे गाजलेली आणि प्रेक्षकांच्या आवडलेली एक मालिका म्हणजे ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’. या मालिकेतील सर्वच कॅरेक्टर्सवर लोकांनी प्रेम केलं. मालिकेतील सर्वात गाजलेली व्यक्तिरेखा म्हणजे तुलसी. अभिनेत्री स्मृती इराणींनी (smriti irani) या मालिकेत तुलसीची प्रमुख भूमिका साकारली होती. 'क्योंकी सांस भी कभी बहू थी'च्या दुसऱ्या सीझनमध्ये तुलसीच्या भूमिकेत स्मृती इराणी कमबॅक करणार का, हा सर्वांच्या मनातला एक प्रश्न. याविषयी स्मृती इराणींना विचारलं असता, त्यांनी दिलेली मोजकीच प्रतिक्रिया चर्चेत आहे.
'क्योंकी सांस भी कभी बहू थी २'मध्ये स्मृती इराणी दिसणार
'क्योंकी सांस भी कभी बहू थी' मालिकेत तुलसी विरानी या भूमिकेत स्मृती इराणींनी आदर्श सुनेचं उदाहरण सर्वांना दिलं. याच मालिकेचा दुसरा सीझन येणार असल्याचं निर्माती एकता कपूरने जाहीर केलं. याविषयी स्मृती इराणींना टाइम्स नाऊच्या एका कार्यक्रमात विचारण्यात आलं. त्यावेळी स्मृती इराणींनी कोणतीच प्रतिक्रिया न देता फक्त 'हम्मम' एवढीच प्रतिक्रिया दिली. त्यामुळे स्मृती इराणी 'क्योंकी सांस भी कभी बहू थी २'मध्ये खरंच काम करणार की नाही, याविषयी काहीच कळालेलं नाही.स्मृती इराणींनी दिलेली ही मोजकीच प्रतिक्रिया सर्वांना संभ्रमात पाडणारी आहे.
दुसरी सीझन फक्त १५० भागांचा
हिंदुस्तान टाइम्स रिपोर्टनुसार, एकता कपूरने 'क्योंकी सांस भी कभी बहू थी'च्या कमबॅकवर शिक्कामोर्तब केलं आहे. तसंच हा सीझन केवळ १५० एपिसोड्सचा असणार आहे असाही तिने खुलासा केला. एकता कपूर म्हणाली,"तेव्हा मालिकेचे १८५० एपिसोड्स झाले आणि मालिकेने निरोप घेतला होता. म्हणजेच मालिकेला २००० चा टप्पा गाठण्यासाठी १५० एपिसोड्सचंच कमी पडत होते. तेच आता आम्ही पूर्ण करु. म्हणूनच दुसरा सीझन १५० एपिसोड्सचा करत २००० चा टप्पा पूर्ण करण्याची योजना आहे." असं एकता कपूरने खुलासा केला. या वर्षाअखेरीस 'क्योंकी सांस भी कभी बहू थी २' रिलीज होण्याची शक्यता आहे.