मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर गुरुराज जोईस (Gururaj Jois) यांचं निधन झालं आहे. आमिर खानच्या सुपरहिट 'लगान' सिनेमासाठी त्यांनी काम केलं होतं. २७ नोव्हेंबर रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने बंगळुरुत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं वय 53 वर्षे होतं. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा आहे.
गुरुराज जोईस यांचं इंडस्ट्रीत मोठं नाव होतं. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक जणांनी शोक व्यक्त केला आहे. आमिर खान प्रोडक्शन्सकडून ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. त्यांनी लिहिले,"गुरुराज जोईस यांच्या निधनाने अतिशय दु:ख होत आहे. एकदम पॅशनेट व्यक्ती ज्याच्या कॅमेऱ्यामागील कामाने 'लगान' ला जीवंत बनवलं. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो'
गुरुराज जोईस यांना हिंदी सिनेमात त्यांच्या अप्रतिम कॅमेरा वर्कसाठी ओळखलं जातं. त्यांनी असिस्टंट सिनेमॅटोग्राफर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 'मुंबई से आया मेरा दोस्त','शूटआऊट अॅट लोखंडवाला','मिशन इस्तंबुल','एक अजनबी','जंजीर' आणि 'गली गली चोर है' सह काही सिनेमांसाठी सिनेमॅटोग्राफी केली आहे.