Join us

पहेचान कौन ? 'लागिरं झालं जी' मालिकेनंतर इतका बदलला अज्या, सध्याचे फोटो पाहून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 09:32 IST

सध्याचे अभिनेते मात्र लूक्स आणि स्टाइलबाबत फारच सजग झाले आहेत. हिंदी अभिनेत्यांमध्ये हा ट्रेंड गेल्या अनेक वर्षांपासून रुढ झाला

मेकओव्हर, लूक बदलणे, स्टाइल स्टेटमेंटमध्ये बदल अशा गोष्टी अनेकदा फक्त अभिनेत्रींबाबत ऐकायला मिळायच्या.मात्र आता काळ बदललाय आणि स्पर्धाही वाढलीय. त्यामुळे या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेन तर काळानुरुप बदलायला हवं ही बाब आता अभिनेत्यांच्याही लक्षात येऊ लागली आहे. त्यामुळे सध्याचे अभिनेते मात्र लूक्स आणि स्टाइलबाबत फारच सजग झाले आहेत. हिंदी अभिनेत्यांमध्ये हा ट्रेंड गेल्या अनेक वर्षांपासून रुढ झाला आहे. असं असलं तरी मराठी अभिनेता कधी ही आपला लूक चेंज करत नाही किंवा तो तसे करायला घाबरतो अशी ओरड अनेकदा ऐकायला मिळते. मात्र सध्याची नव्या कलाकारांची पीढि या गोष्टीला छेद देणारी आहे. याचेच ताजे उदाहरण म्हणजे नितीश चव्हाण.लागीरं झालं जी मालिकेत नितीशने साकारलेला अज्याने रसिकांचे भरघोस मनोरंजन केले.

मालिकेतील सर्वच भूमिका रसिकांना पसंत होत्या. मात्र नितीश चव्हाणने साकारलेला अज्या अधिक भाव खावून गेला. मालिका बंद झाली असली तरीही आजही अज्याला रसिक विसरलेले नाहीत.अजिंक्यचा लूक ऑनस्क्रीन लूक रसिकांमध्ये विशेषतः तरुणींमध्ये हिट ठरला. आता तुमच्या लाडक्या अजिंक्यचा म्हणजेच नितीश चव्हाणचा डॅशिंग लूक समोर आला आहे.

कुण्या आघाडीच्या मॉडेलला लाजवेल असा डॅशिंग, रॉकिंग आणि कूल अंदाज तरुणींना घायाळ करेल. टी-शर्ट, स्टायलिश जीन्स आणि आकर्षक अशी बॉडी असा अंदाज असलेला अजिंक्यचा हा फोटो खास आणि तितकाच आकर्षक आहे. अजिंक्य म्हणजेच नितीशचा हा फोटो लंडनमध्ये क्लिक केलेला आहे.

टॅग्स :लागिरं झालं जीनितीश चव्हाण