Join us

Lakme Fashion Week 2019 : अन् रॅम्पवर पडता पडता वाचली यामी गौतम...पाहा व्हिडीओ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 11:54 AM

  मंगळवारी लॅक्मे फॅशन वीक 2019 ची सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी अभिनेत्री तब्बू आणि करण जोहर यांनी या शोच्या रॅम्पवर आपला जलवा दाखवला. दुस-या दिवशी अभिनेत्री यामी गौतम रॅम्पवर उतरली. पण अगदी पडता पडता वाचली.

ठळक मुद्देनुकताच यामीचा ‘उरी - द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात ती विकी कौशलसोबत दिसली. या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर छप्परफाड कमाई केली.

  मंगळवारी लॅक्मे फॅशन वीक 2019 ची सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी अभिनेत्री तब्बू आणि करण जोहर यांनी या शोच्या रॅम्पवर आपला जलवा दाखवला. दुस-या दिवशी अभिनेत्री यामी गौतम रॅम्पवर उतरली. पण अगदी पडता पडता वाचली. होय, लॅक्मे फॅशन वीक 2019च्या रॅम्पवर यामीने डिझाईनर गौरी आणि नैनिकाच्या यांच्यासाठी रॅम्पवॉक केले. गौरी आणि नैनिकाची शो स्टॉपर बनलेल्या यामीने न्यूड कलरच्या गाऊनमध्ये झकास एन्ट्री घेतली. लाईट मेकअप, न्यूड लिपस्टिक, स्मोकी आईज आणि ओठांवर गोड हसू अशा अंदाजात यामी स्टेजवर आली अन् काही पावलांवर अडखळली. लॉन्ग गाऊनमध्ये बूट अडकल्याने तिचा तोल गेला. आता यामी पडणार, असे वाटत असतानाच तिने अतिशय शिताफीने स्वत:ला सांभाळले आणि पुन्हा रॅम्पवॉक करू लागली.

यावेळी यामीने दाखवलेला आत्मविश्वास कौतुकास्पद होता. तुम्हीही हा व्हिडिओ पाहा आणि यामीचा कॉन्फिडन्स कसा वाटला, ते नक्की कळवा. लॅक्मे फॅशन वीक 2019 च्या रॅम्पवरचा यामीचा हा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होतोय. पडता पडता बचावलेल्या यामीला प्रेक्षक चिअरअप करताना यात दिसताहेत.

‘काबील’, ‘सनम रे’, ‘जुनूनियात’,‘विकी डोनर’,‘बदलापूर’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारून तिने आपला वेगळा ठसा उमटवला. नुकताच यामीचा ‘उरी - द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात ती विकी कौशलसोबत दिसली. या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर छप्परफाड कमाई केली. चित्रपटातील यामीच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले.

टॅग्स :यामी गौतमउरी