Join us  

मराठी चित्रपटसृष्टीत लक्ष्मीची पावले

By admin | Published: November 12, 2015 12:18 AM

आशयघनता घेऊन प्रयोगशीलतेच्या दिशेने सुरू झालेला मराठी चित्रपटसृष्टीच्या प्रवासात यंदाचा पाडवा लक्ष्मीची पावले घेऊन आला आहे.

आशयघनता घेऊन प्रयोगशीलतेच्या दिशेने सुरू झालेला मराठी चित्रपटसृष्टीच्या प्रवासात यंदाचा पाडवा लक्ष्मीची पावले घेऊन आला आहे. दोन वेगळ्या प्रकारचे चित्रपट, पण त्यासाठी सारखीच उत्सुकता आणि दोन्हीही शुक्रवारी प्रदर्शित करण्याची मानसिकता सोडून गुरुवारीच प्रदर्शित होत आहेत. ‘मुंबई- पुणे - मुंबई २, लग्नाला यायचंच’ (एमपीएम २) आणि ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटांबद्दल मराठी रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ ही एथनिक भरजरी पैठणी, तर ‘एमपीएम- २’ म्हणजे ताज्या टवटवीत प्रेमकहाणीची सोनेरी किनार असलेली खास रसिकांच्या आग्रहास्तव येत असलेली डिझायनर स्टोरी असे या दोन्ही चित्रपटांचे वर्णन करता येईल. तरुणाईला मराठी चित्रपटांकडे वळविण्यात महत्त्वाचा वाटा असलेले स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, सुबोध भावे पाडव्यापासून मराठी मनावर अधिराज्य गाजविण्यासाठी तयार आहेत. अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या सतीश राजवाडे यांनी ‘एमपीएम२’ चे दिग्दर्शक आहेत, तर प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे याने साडेतीन वर्षांच्या मेहनतीने ‘कट्यार काळजात घुसली’ सादर केला आहे.बिगबजेट चित्रपटांची भीती बाळगून अनेक निर्माते त्या काळात चित्रपट प्रदर्शित करण्यास धजावत नाहीत. दिवाळीच्या काळात सलमान खानचा चित्रपट येतोय. तरीही एस्सेल व्हिजनने चित्रपट प्रदर्शित करण्याचे धाडस केले आहेत. कोणत्याही स्पर्धेला न घाबरता आपण ताठपणे उभे राहिले पाहिजे. आपणही त्यांच्याबरोबरीचे आहोत हा विश्वास आपल्यात असला पाहिजे, हेच आम्हाला दाखवून द्यायचे आहे. - निखिल साने, बिझनेस हेड, एस्सेल व्हिजनहा सिनेमा दिवाळीतच प्रदर्शित करायचा, यावर आम्ही ठाम होतो. कारण दिवाळीसाठी ही खास भेट आहे. दिवाळीत चित्रपट प्रदर्शित करण्यात मला तरी काही धोका वाटत नाही. इतर कुणाची स्पर्धाही आम्हाला नाही. आमचा चित्रपटही तेवढ्याच ताकदीचा आहे. गेल्या दोन वर्षांत दिवाळीच्या सुमारास आलेले चित्रपटही चालले आहेत.- संजय छाब्रिया, निर्मातादिवाळीला सणाचा एक मूड असतो आणि हा चित्रपट त्यात अचूक बसणारा आहे. दिवाळीच्या माहोलाला अधिक आनंदमयी करणारा हा सिनेमा आहे. तुळशीच्या लग्नापासून आता लग्नसराईलासुद्धा सुरुवात होईल. त्यामुळे या सिनेमातली लगीनघाई या माहोलाशी अचूक जुळते. यात उत्सवाचाच फील आहे आणि त्यामुळे हा दिवाळीचा सिनेमा आहे. - स्वप्नील जोशी, अभिनेतानिर्मात्यांनी अनेक नवऱ्यांचा विचार करून पाडवा हा दिवस निवडला आहे. पाडव्याला हा चित्रपट प्रदर्शित करून मी समस्त नवरे मंडळींची सोय केली आहे. प्रत्येक नवऱ्याला आपल्याला भेट देता यावी, हा निर्मात्यांचा त्यामागचा विचार असावा. कारण ही भेट रेशमी आहे, सुगंधी आहे...आणि ‘कट्यार... ’म्हणजे दुसरं काही नसून, उत्तम विणलेली पैठणी आहे. त्यामुळे यापेक्षा सुंदर अशी भेट असूच शकत नाही. - सुबोध भावे, अभिनेता