Join us

ललित मोदी अन् सुष्मिता सेन यांचे ब्रेकअप? नव्या गर्लफ्रेंडसोबत फोटोंचा व्हिडीओ अल्बम पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 19:03 IST

ललित मोदी याने काही वर्षांपूर्वी सुष्मिता सेनवर प्रेम व्यक्त केले होते. दोघांचे प्रेमलापातील फोटो पोस्ट करून खळबळ उडवून दिली होती.

आयपीएलचा माजी अध्यक्ष आणि भारतातून पळून गेलेले ललित मोदी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्यात सुरु असलेले अफेअर जगासमोर आले आणि त्यांच्यात बिनसले होते. आता याला फुलस्टॉप लागल्याचे दिसत आहे. ललित मोदी याने व्हॅलेंटाईन डे दिवशी पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचे जाहीर केले आहे. 

ललित मोदी याने काही वर्षांपूर्वी सुष्मिता सेनवर प्रेम व्यक्त केले होते. दोघांचे प्रेमलापातील फोटो पोस्ट करून खळबळ उडवून दिली होती. यानंतर सुष्मिताला भारतीय नेटकऱ्यांनी फैलावर घेतले होते. आता फोटोच असे होते की त्यावरून नेटकरी काय ते समजूनही गेले होते. परंतू, इमेज डॅमेज होतेय हे पाहून सुष्मिताने ललित मोदीसोबत ब्रेकअपही केले होते. 

वयाच्या ६१ व्या वर्षी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मोदीने पुन्हा एकदा लकी ठरल्याचे जाहीर करून टाकले आहे. आपल्या २५ वर्षांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले असल्यााचे म्हटले आहे. असे करताना मात्र ललित मोदीने त्या महिलेचे नाव मात्र सांगितलेले नाही. परंतू ती भारतीय नसून परदेशी नागरिक आहे. ललित मोदीने या महिलेसोबतचे असंख्य फोटो व्हिडीओ अल्बम बनवून पोस्ट केले आहेत. यामध्ये ती आणि तो एकत्र दिसत आहेत, पार्ट्या करत आहेत. 

ललित मोदी याने १९९१ मध्ये मीनल संगराणीशी लग्न केले होते. २०१८ मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाले. मीनलचे हे दुसरे लग्न होते. ललित आणि मीनल यांच्या वयात १० वर्षांचे अंतर होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. मग ललितला सुष्मिता आवडली, तिला त्याने प्रपोजही केले. दोघांत प्रेमसंबंध आहेत, हे दर्शविणारे फोटो त्याने पोस्ट केले आणि त्यांच्यात बिनसले. 

टॅग्स :ललित मोदीसुश्मिता सेन