Join us

अरेरे... या नळामुळे याचा दमयंती झाला रे...! अभिनेता ललित प्रभाकरचा व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 16:05 IST

WATCH VIDEO : बाथरूममधील ललितचा हा भन्नाट आणि मजेशीर व्हिडीओ पाहताना तुम्हाला हसू आवरणार नाही आणि या व्हिडीओवरच्या सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया वाचून तर तुम्ही पोट दुखेपर्यंत हसाल.

ठळक मुद्देललित हा एक गुणी अभिनेता आहे रंगभूमी, छोटा पडदा आणि रुपेरी पडद्यावर त्याने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) हा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता. हंपी, आनंदी गोपाळ या सिनेमातील त्याच्या भूमिका प्रचंड गाजल्या. आता याच ललितचा एक व्हिडीओ गाजतोय. होय, त्यानं शेअर केलेला व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.  बाथरूममधील ललितचा हा भन्नाट आणि मजेशीर व्हिडीओ पाहताना तुम्हाला हसू आवरणार नाही आणि या व्हिडीओवरच्या सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया वाचून तर तुम्ही पोट दुखेपर्यंत हसाल.या व्हिडीओत ललित एका वॉशबेसीनसमोर उभा आहे. पण नळातून काही पाणी येत नाही. हा नळ कसा सुरू करावा, सुरूवातीला हेच ललितला कळत नाही. यानंतर काय तर एका नळा खाली हात धरला असेल तर पलीकडच्या नळातून पाणी यायला सुरुवात होते आणि पलीकडच्या नळाखाली हात धरला त तर अलीकडच्या नळातून पाणी वाहायला लागतं. बिच्चारा ललित जाम वैतागतो. ‘हाथ भी नही आया और मूँह भी नही लगा’,अशीच त्याची एकूण अवस्था होते.  

ललितनं हा व्हिडीओ शेअर केला आणि त्याच्या व्हिडीओवर अक्षरश: कमेंट्सचा पाऊस पडला. अगदी सेलिब्रिटींनाही या व्हिडीओवर प्रतिक्रिया देण्याचा मोह आवरता आला नाही.  अमृता खानविलकर, श्रेया बुगडे यांची हसून हसून पुरेवाट झाली.  

‘नळ स्टॉपच्या टॉयलेटमध्ये असंच असतं...,’ अशी कमेंट अभिनेता अमेय वाघने केली. विशेष म्हणजे, त्याच्या या कमेंटला ललितनं मोठं मजेशीर उत्तर दिलं.‘अरे पण या नळामुळे माझा दमयंती झाला...,’ असं ललितनं लिहिलं.  चाहत्यांनीही या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स केल्या. भाई, शर्टला हात पूस अन् ये बाहेर, असं एका चाहत्यानं लिहिलं.  

ललित हा एक गुणी अभिनेता आहे रंगभूमी, छोटा पडदा आणि रुपेरी पडद्यावर त्याने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.  जुळून येती रेशीमगाठी  ही मालिका तसंच चि. व चि.सौ.कां या सिनेमातील त्याच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. याशिवाय  ढोल ताशे  आणि  पती गेले गं काठेवाडी  यासह विविध नाटकतही त्याने प्रमुख तसंच लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. 

टॅग्स :ललित प्रभाकर