ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर(Lata Mangeshkar) यांच्या प्रकृतीची सर्वांनाच चिंता आहे. ८ जानेवारीला लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली होती आणि तेव्हापासून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लता मंगेशकर लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी जगभरातील चाहते प्रार्थना करत आहेत.
लता मंगेशकर यांच्या प्रवक्त्या अनुषा श्रीनिवासन अय्यर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या लतादीदींची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतर त्यांना घरी आणले जाईल.
९२ वर्षीय लता मंगेशकर यांनाही कोरोनासोबत न्यूमोनिया झाला आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर त्यांच्या वयाबद्दल अधिक सतर्क आहेत आणि त्यामुळेच त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची माहिती देताना डॉक्टरांनी सांगितले होते की, त्यांना १०-१२ दिवस रुग्णालयात ठेवण्यात येईल, जेणेकरून त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली चांगले उपचार होऊ शकतील. लतादीदींच्या तब्येतीत सध्या सुधारणा होत आहेत. पण अद्याप त्या आयसीयूमध्येच असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
लता मंगेशकर या देशातील गानकोकिळा म्हणून ओळखल्या जातात. त्यांची प्रत्येक गाणी सदाबहार आहेत. त्यांना प्रत्येक गायक आपला आदर्श मानतो. त्यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायिली आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.लता मंगेशकर यांनी फक्त हिंदी मराठीच नव्हे तर तब्बल 36 भाषांमध्ये गाणी गायिली आहेत.