Join us

Lata Mangeshkar Health Update: लतादीदीं अजूनही ICU मध्येच, मात्र, प्रकृतीत होतेय सुधारणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 2:07 PM

लता मंगेशकर (Lata Mangeshkar ) यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. कोरोनासोबतच न्यूमोनियाचीही लक्षणे दिसून आली होती म्हणून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे.

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar ) गेल्या १५ दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत.  8 जानेवारी रोजी, कोरोना पॉझिटिव्ह आणि न्यूमोनिया झाल्यानंतर, त्यांना  आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. 

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत पूर्वीपेक्षा जास्त सुधारणा झाली आहे (Lata Mangeshkar Health Update). लता मंगेशकरच्या प्रवक्त्या अनुषा श्रीनिवासन अय्यर यांनी अलीकडेच त्यांच्या तब्येतीच्या अफवा आणि खोट्या बातम्यांना पूर्णविराम देण्यास सांगितले आहे.

लता मंगेशकर यांच्यावर देखरेख ठेवणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, लता दीदी या ९२ वर्षांच्या आहेत, त्यामुळे त्यांना आणखी काही दिवस आयसीयूमध्येच  ठेवावे लागेल. त्या पूर्णपणे बऱ्या  झाल्यानंतरच त्यांना आयसीयूमधून बाहेर काढले जाईल. त्याचवेळी लता मंगेशकर प्रवक्त्या अनुषा श्रीनिवासन अय्यर यांचे एक वक्तव्यही समोर आले आहे.

लता मंगेशकर यांच्या प्रवक्त्या अनुषा श्रीनिवासन अय्यर यांच्या वतीने सांगण्यात आले की, लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत अनेक प्रकारच्या खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत. अशा बातम्यांवर चाहत्यांवर विश्वास ठेवू नका. लता मंगेशकर यांच्यावर डॉ. प्रतीत समदानी आणि इतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :लता मंगेशकरबॉलिवूड