‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम लता सबरवालचा ‘टीव्ही’ला रामराम, पोस्ट शेअर करत केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 05:08 PM2021-02-07T17:08:56+5:302021-02-07T17:12:20+5:30

लता सबरवाल यांनी 1999 साली ‘गीता रहस्य’ या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर डेब्यू केला होता.

lataa saberwal aka rajshri of yeh rishta kya kehlata hai left tv industry | ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम लता सबरवालचा ‘टीव्ही’ला रामराम, पोस्ट शेअर करत केली घोषणा

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम लता सबरवालचा ‘टीव्ही’ला रामराम, पोस्ट शेअर करत केली घोषणा

googlenewsNext
ठळक मुद्दे‘ये रिश्ता क्या कहलाता है’या मालिकेत त्यांनी अक्षरा बहू (हिना खान)च्या आईची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका चांगलीच लोकप्रिय झाली होती.

ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री लता सबरवालने डेली सोप्सला अलविदा केले आहे. होय, आता लता सबरवाल छोट्या पडद्यावरच्या मालिकांमध्ये दिसणार नाहीत. लता यांनी सोशल मीडियावर स्वत: याची घोषणा केली.
‘मी औपरिकपणे घोषणा करतेय की, मी डेली सोप्स करणे बंद केले आहे. अर्थात वेबसीरिज, चित्रपट वा चांगल्या कॅमिओ रोलसाठी मी एकदम तयार आहे. डेली सोप्स, माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनण्यासाठी धन्यवाद,’ अशी पोस्ट लता यांनी शेअर केली आहे.

लता सबरवाल यांनी 1999 साली ‘गीता रहस्य’ या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर डेब्यू केला होता. या मालिकेत त्यांनी द्रौपदीची भूमिका साकारली होती. यानंतर त्यांनी डझनावर मालिकेत काम केले.

जन्नत, कहता है दिल, शाका लाका बूम बूम, आवाज- दिल से दिल तक, दिशाएं, खुशियां, वो रहने वाली महलों की, नागीन, घर एक सपना, वो अपना सा, ये रिश्ते प्यार के, इश्क में मरजांवा अशा मालिकेत त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या.

ये रिश्ता क्या कहलाता है’या मालिकेत त्यांनी अक्षरा बहू (हिना खान)च्या आईची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका चांगलीच लोकप्रिय झाली होती. बॉलिवूडच्या अनेक सिनेमातही त्यांनी काम केले. ‘विवाह’ या सुपरहिट सिनेमात त्यांनी शाहिद कपूरच्या वहिनीची भूमिका वठवली होती. तर सलमानच्या ‘पे्रम रतन धन पायो’ या सिनेमातही त्यांची भूमिका होती. 

Web Title: lataa saberwal aka rajshri of yeh rishta kya kehlata hai left tv industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.