Join us

दिवंगत अभिनेता सुंशात सिंह राजपूतच्या अभिनेत्रीचं मोठं विधान, म्हणाली "आपल्या देशात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 13:58 IST

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या 'दिल बेचारा' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली संजना सांघी चर्चेत आली आहे.

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री ज्या सामाजिक विषयांवर बेधडकपणे आपलं मत मांडतात. अशी एक अभिनेत्री आहे संजना सांघी. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या 'दिल बेचारा' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली संजना सांघी चर्चेत आली आहे. नुकतंच एनडीपी युथ चॅम्पियन असलेल्या अभिनेत्रीनं एका कार्यक्रमात बोलताना शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित केलं. आपल्या देशातील निरक्षरता ही सर्वात मोठी सामाजिक समस्या असल्याचं मत तिनं मांडलं. 

आपल्या प्रवासाबद्दल ती म्हणाली,  "मला आठवतं एकदा मी एम्मा वॉटसनला संयुक्त राष्ट्रांमध्ये बोलताना पाहिलं होतं आणि तिथूनच मी प्रभावित झालो. मुलांना शिकवल्यानं त्यांच्याशी जोडली गेले. अखेर मी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करण्यास आणि तो उपक्रम पुढे नेण्यास सुरुवात केली.  असं राष्ट्र निर्माण व्हावं, जिथे आपल्या एकही निरक्षर नसेल, असे माझे स्वप्न आहे. मला वाटते की शिक्षणाचा अभाव ही आपल्या देशातील सर्वात मोठी सामाजिक समस्या आहे".

संजना पुढे म्हणाली की, "शिक्षणाचा अभाव हे आपल्यासमोरील प्रमुख समस्यांचे मूळ कारण आहे. लिंग भेदभाव, वेतन असमानता, मासिक पाळी आरोग्याविषयी जागरूकता, महिलांचे हक्क इत्यादी विषयांवर मोकळेपणाने बोलू शकू. दुर्दैवाने, लॉकडाऊन दरम्यान अभ्यासातून असं दिसून आलं आहे की १ कोटी मुलींना शाळा सोडण्यास आणि घरी राहण्यास भाग पाडलं गेलं. यात मुलांची संख्या दहा लाखांपेक्षा कमी होती".

संजना सांघीच्या बॉलिवूडमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर तिनं ‘रॉकस्टार’ या चित्रपटात संजनाने नरगिसच्या बहिणीची भूमिका साकारली होती. संजना यात सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत होती. त्यानंतर संजनाने दिवंगत अभिनेता इरफान खान यांच्या हिंदी मीडियम सिनेमात छोटासा रोल केला होता. यासोबतच  २०१७ मध्ये रिलीज झालेल्या 'फुकरे रिटर्न्स' या चित्रपटात अभिनेता वरुण शर्माच्या गर्लफ्रेंडचा रोल संजनाने साकारला होता. 'रॉकस्टार', 'फुकरे रिटर्न्स', 'हिंदी मीडियम' या चित्रपटांमध्ये संजनाने छोट्या भूमिका साकारल्या होत्या. परंतु, तिला प्रमुख भूमिका साकारण्याची संधी ‘दिल बेचारा’ या चित्रपटातून मिळाली होती. हा सिनेमा तिचा बॉलिवूड पदार्पणातला पहिलाच चित्रपट होता. 

टॅग्स :सेलिब्रिटीसुशांत सिंग रजपूतशिक्षणसंयुक्त राष्ट्र संघ