Join us

उशीरा का होईना, आमिरने दिला झायरा वासिमला पाठिंबा

By admin | Published: January 17, 2017 12:07 PM

ओमर अब्दुल्ला, जावेद अख्तर, अनुपम खेर, सोनू निगमसारख्या सेलिब्रिटींनी झायरा वसीमला पाठिंबा दर्शवला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ -  जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या भेटीमुळे दंगलफेम झायरा वसीम वादाच्या गर्तेत सापडली. काश्मिरमधल्या पीडितांना भेटायचे सोडून काश्मिरमधल्या त्रासाला जबाबदार असलेल्यांना म्हणजे मुफ्तींना ती का भेटली असा सगळा टीकेचा रोख होता. काश्मिरमधल्या फुटीरतावाद्यांनी व त्यांना सहानुभूती असलेल्यांनी झायराला लक्ष्य केले आणि सोशल मीडियावर जाहिराच्या विरोधात तसेच तिच्यामागे प्रचंड प्रमाणात नेटिझन्स उभे राहिले. राज्यातील लोकांच्या भावना कथितरीत्या दुखावल्याचा आरोप करत  तिला टार्गेट करून ट्रोलही करण्यात आले. मात्र अनेकांनी तिला पाठिंबा दर्शवला असून त्यामध्ये  माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, जावेद अख्तर, अनुपम खेर, स्वरा भास्कर या बॉलिवूड सेलिब्रिटींसह कुस्तीपरटू गीता फोगटचाही समावेश आहे. #ZairaWasim या हॅशटॅगसह  अनेकांनी तिच्या समर्थनार्थ पोस्ट केल्या आहेत.
आज, आमिर खाननेही झायराला पाठिंबा व्यक्त करणारे ट्विट केले आहे.
मूळची जम्मू-काश्मीरमची नागरिक असलेली झायरा वसीम 'दंगल' चित्रपटातील लहानग्या गीताच्या भूमिकेत झळकली आणि तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. मात्र शनिवारी झायराने मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतली व त्या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. याच मुद्यावरून लोकांनी तिला टार्गेट करण्यात आले, ज्यानंतर झायराने सोशल एका पब्लिक पोस्टद्वारे माफी मागितली. मात्र अवघ्या काही वेळातच तिने हा माफीनामा सोशल मीडियावरून हटवला. या एकंदर प्रकरणावरून बरीच चर्चा सुरू असताना अनेक दिग्गज मात्र तिच्या समर्थनार्थ उतरले आहेत. 
त्यांच्यापैकीच एक म्हणजे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करत झायराला पाठिंबा दर्शवला. ' मेहबूबा मुफ्तींची भेट घेतली म्हणून अवघ्या १६ वर्षांच्या मुलीला जबरदस्ती माफी मागायला लावणे योग्य नाही. आपण कुठे जात आहोत' असे ट्विट त्यांनी केले आहे. 
{{{{twitter_post_id####}}}} {{{{twitter_post_id####}}}}