दिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्या पत्नी नंदिता यांनी अभिनेत्री दिव्या दत्ता, जावेद सिद्दीकी आणि अमरिक गिलविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्याचे कळतेय. हे प्रकरण एका नाटकाशी संबंधित आहे. ‘तेरी अमृता’ नामक पंजाबी नाटकाचा कॉपी राईट ओमपुरी यांच्या कंपनीकडे आहे. दिव्या दत्ताने हे नाटक नव्या रूपात रंगमंचावर आणण्याची तयारी सुरू केली होती आणि सोबतचं नाटकाचे हक्क खरेदी करण्याचे प्रयत्नही चालवले होते. पण चर्चा फिस्कटली आणि दिव्या दत्ताने परवानगीविनाचं हे नाटक रंगमंचावर आणण्याचा निर्णय घेतला. येत्या ९ सप्टेंबरला मुंबईत याचे प्रीमिअरही ठेवण्यात आल़े. यावर आक्षेप घेत ओम पुरी यांच्या पत्नी नंदिता यांनी दिव्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.