Join us

ललित प्रभाकरला फिरण्याचा छंद, त्याला पर्यटनातून मिळते नवी ऊर्जा आणि जगण्याची प्रेरणा,SEE PICS

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 09:46 IST

अलेप्पी इथली ट्रीप ललितसाठी थोडी खास होती. कारण तिथं एका पर्यटकाने त्याला ओळखले आणि मालिकेतील त्याच्या भूमिकेविषयी त्या पर्यटकाने ललितचं भरभरून कौतुक केलं.

प्रत्येकाला काही ना काही छंद किंवा आवड असते. सर्वसामान्य असो किंवा मग सेलिब्रिटी, सगळेच आपला छंद आणि आवड जोपासताना पाहायला मिळतात. मराठी अभिनेता ललित प्रभाकरलाही अशीच एक आवड आहे. त्याला फिरायला आवडतं. विविध भागात फिरायला जाणं त्याची आवड आहे. नुकतंच तो भारतातील विविध भागात फिरून आला. १३ दिवसांत त्याने विविध स्थळांना भेट दिली. पर्यटन किंवा फिरायला जाणं हे आपल्याला आवडतं आणि त्यातून नवी प्रेरणा मिळते असं ललित सांगतो.

एकट्याने फिरणं असो किंवा मग सामूहिक फिरणं दोन्ही पर्यटनाचा तो मनमुराद आनंद घेतो. या पर्यटना दरम्यान त्याला अनेक चांगले अनुभव येतात शिवाय विविध लोकांच्या भेटीगाठी होऊन तिथली संस्कृती अनुभवायला मिळते असं त्याने सांगितले आहे. अलेप्पी इथली ट्रीप ललितसाठी थोडी खास होती. कारण तिथं एका पर्यटकाने त्याला ओळखले आणि मालिकेतील त्याच्या भूमिकेविषयी त्या पर्यटकाने ललितचं भरभरून कौतुक केलं. शिवाय चि. आणि सौ. सिनेमातील ललितची भूमिकाही या पर्यटकाला भावली होती. रंगभूमी, छोटा पडदा आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका तसंच 'चि. व चि.सौ.कां' या सिनेमातील त्याच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. 

कओव्हर, लूक बदलणे, स्टाइल स्टेटमेंटमध्ये बदल अशा गोष्टी अनेकदा फक्त अभिनेत्रींबाबत ऐकायला मिळायच्या. मात्र आता काळ बदललाय आणि स्पर्धाही वाढलीय. त्यामुळे या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेन तर काळानुरुप बदलायला हवं ही बाब आता अभिनेत्यांच्याही लक्षात येऊ लागली आहे. त्यामुळे सध्याचे अभिनेते मात्र लूक्स आणि स्टाइलबाबत फारच सजग झाले आहेत. हिंदी अभिनेत्यांमध्ये हा ट्रेंड गेल्या अनेक वर्षांपासून रुढ झाला आहे. असं असलं तरी मराठी अभिनेता कधी ही आपला लूक चेंज करत नाही किंवा तो तसे करायला घाबरतो अशी ओरड अनेकदा ऐकायला मिळते. मात्र सध्याची कलाकारांची पीढी या गोष्टीला छेद देणारी आहे. याचेच ताजे उदाहरण म्हणजे ललित प्रभाकर बदललेला लूक, रॉकिंग अंदाज, स्टाइल, हटके हेअर स्टाइलमुळेही ललित सा-यांचे लक्षवेधून घेत असतो.

टॅग्स :ललित प्रभाकर