Join us

माझी रुक्मिणी सोडून चाल्लीय

By admin | Published: May 18, 2015 11:22 PM

‘कोणीतरी कधीतरी अचानक आपल्या आयुष्यात येतं आणि आपल्या खूप जवळचं होऊन जातं़़़ मग खूप वेळा भेटीगाठी होतात. एकमेकांना समजून घेतलं जातं.

‘कोणीतरी कधीतरी अचानक आपल्या आयुष्यात येतं आणि आपल्या खूप जवळचं होऊन जातं़़़ मग खूप वेळा भेटीगाठी होतात. एकमेकांना समजून घेतलं जातं. जवळीक होत जाते. एकमेकांबद्दल खूप ओढ वाटू लागते. आणि मग पुन्हा अचानकच ती आपल्याला सोडून जाणार हे कळतं़़़ आणि मग खूपच असाहाय्य..़ अगतिक..़ एकटं वाटायला लागतं. हे सगळं माझ्या बाबतीत घडेल असं कधीच वाटलं नव्हतं़़़ पण घडलंय.. माझी रुक्मिणी सोडून चाल्लीय मला... कधीतरी ती नक्की परत येईल, अशी आशा आहे मनात...’ हे दु:ख व्यक्त केलयं ते अभिनेता प्रसाद ओक याने. आता तुम्ही म्हणाल प्रसादची ही रुक्मिणी कोण़़़? तर ही रुक्मिणी म्हणजे प्रसादने साकारलेले नांदी या नाटकातील पात्र. नुकताच ‘नांदी’चा शेवटचा प्रयोग सादर झाला. म्हणूनच प्रसादने ही हळहळ सोशल साइटवर व्यक्त केली़