Join us

'मी कोणालाही घाबरत नाही'; 'काली' पोस्टर वादावर लीना मणिमेकलाई यांची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 13:23 IST

Kaali: सोशल मीडियावर #ArrestLeenaManimekal हा हॅशटॅग देखील व्हायरल झाला. त्यामुळे या प्रकरणी लीना यांनी ट्विट करत त्यांचं मत मांडलं आहे.

लीना मणिमेकलाई (Leena Manimekalai) यांचा काली (Kaali) हा माहितीपट (डॉक्युमेंट्री) सध्या चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या माहितपटाचं अलिकडेच एक पोस्टर प्रदर्शित झालं. यात काली मातेला सिगारेट ओढताना, आणि एका हातात LGBTQ चा झेंडा घेतलेलं दाखवलं आहे. त्यामुळे हा माहितीपट वादात सापडला आहे. अनेक ठिकाणी या माहितीपटावर आक्षेप घेत लीना यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विविध स्तरांमधून टिकास्त्र होत असतानाच आता लीना यांनी याविषयी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

ऱ्हिदम्स ऑफ कॅनडा नावाच्या कार्यक्रमादरम्यान अगा खान संग्रहालयामध्ये कालीचं पोस्टर लॉन्च करण्यात आलं. या माहितीपटाच्या (Documentry) पोस्टरमधून कालीमातेचा अपमान करण्यात आला असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. इतकंच नाही तर सोशल मीडियावर #ArrestLeenaManimekal हा हॅशटॅग देखील व्हायरल झाला. त्यामुळे या प्रकरणी लीना यांनी ट्विट करत त्यांचं मत मांडलं आहे.

काय म्हणाल्या लीना मणिमेकलाई?

"माझ्याकडे गमावण्यासाठी काहीच नाही. मी कोणालाही घाबरत नाही. याची किंमत जर माझं आयुष्य असेल तर मी माझं आयुष्य ही द्यायाला तयार आहे. जी माणसं कोणतीही भीती न बाळगता आवाज उठवतात त्यांना नेहमी माझा पाठिंबा असतो", असं ट्विट लीना यांनी केलं आहे.

काय आहे वाद?

2 जुलै रोजी चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांनी त्यांच्या माहितीपट 'काली'चे पोस्टर शेअर केले होते. कॅनडा फिल्म्स फेस्टिव्हलमध्ये (रिदम्स ऑफ कॅनडा) ही डॉक्युमेंट्री लाँच करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. पोस्टरमध्ये माँ कालीच्या हातात सिगारेट आहे. एवढेच नाही तर या पोस्टरमध्ये एका हातात माँ कालीचा त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात LGBTQ समुदायाचा ध्वजही दिसत आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटी