Join us

दिग्गज कलाकारांची फौज नगरसेवकमध्ये

By admin | Published: March 22, 2017 1:07 AM

चित्रपटातील नायकाप्रमाणे खलनायकही प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. आता नगरसेवक या चित्रपटात सशक्त अभिनेत्यांची फौज आपल्याला

चित्रपटातील नायकाप्रमाणे खलनायकही प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. आता नगरसेवक या चित्रपटात सशक्त अभिनेत्यांची फौज आपल्याला खलनायकाच्या रूपात दिसणार आहे. जश पिक्चर्स प्रस्तुत शशिकांत चौधरी आणि जयश्री चौधरी निर्मित ‘नगरसेवक एक नायक’ या मराठी चित्रपटात सयाजी शिंदे, गणेश यादव, सुनील तावडे, संजय खापरे ही मंडळी दिसतील. हे सगळेच या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट ३१ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रत्येक नेता हा अभिनेता असतो, असे म्हणणाऱ्या दत्ता शिवलकरची भूमिका या चित्रपटात गणेश यादवने साकारली आहे, तर सयाजी शिंदे या चित्रपटात भाऊ शेट्टी ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. भाऊ शेट्टी या चित्रपटात एका पक्षप्रमुखाच्या भूमिकेत दिसेल. सुनील तावडे आमदार काळेच्या भूमिकेत, तर बेरकी कार्यकर्त्याच्या भूमिकेत संजय खापरे दिसणार आहेत. या चित्रपटातील नायक-खलनायकांची जुगलबंदी ही प्रेक्षकांसाठी एक ट्रीटच असेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन दीपक कदम करणार असून नगरसेवकमधील या खलप्रवृत्तीच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना नक्कीच आवडतील, अशी चित्रपटाच्या टीमला खात्री आहे. या चित्रपटात उपेंद्र लिमये, नेहा पेंडसे, विजय निकम, श्याम ठोंबरे, सविता मालपेकर, त्रियोगी मंत्री, प्रियांका नागरे, अभिजित कुलकर्णी, अशोक पाडवे, यश कदम, वर्षा दादंळे, मयूरी देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा बिपीन धायगुडे आणि अभिजित कुलकर्णी यांनी लिहिलेली असून, संवाद योगेश मार्कंडे यांनी लिहिले आहेत. तर, या चित्रपटाचे छायांकन त्रिलोकी चौधरी यांचे असून संकलन सुबोध नारकर यांनी केले आहे.