Liger Box Office Collection Day 2: विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडे (Ananya Panday)स्टारर 'लायगर' (Liger) या चित्रपटाची बरीच चर्चा होती. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी जगभरात 33.12 कोटी रुपयांची कमाई केली. त्याचबरोबर दुसऱ्या दिवसाचे कलेक्शनही समोर आले आहे.
ज्यापद्धतीने विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांच्या चित्रपटाचे प्रमोशन केले जात होते. ते पाहून चित्रपट बक्कळ कमाई करेल असे वाटत होते. पण पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाच्या कलेक्शननंतर सगळ्यावर पाणी फेरलं आहे. दुसऱ्या दिवशी लायगरच्या कमाईत मोठी घसरण झाली. बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, या चित्रपटाने केवळ 16 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
निगेटीव्ह रिव्ह्यूमुळे होणार मोठं नुकसान?‘लाइगर’चं देशभर जबरदस्त प्रमोशन झालं होतं. विजय देवरकोंडाने प्रमोशनचा धडाका लावला होता. यामुळे मोठ्या प्रमाणात अॅडव्हान्स बुकिंग झालं होतं. पण चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरला नाही. ट्विटरवर प्रेक्षकांनी या चित्रपटावर निगेटीव्ह रिव्ह्यू दिले आहेत. मात्र याऊपर अॅडव्हान्स बुकिंगमुळे ‘लाइगर’ला ग्रँड ओपनिंग मिळाली. पण कलेक्शनमध्ये निगेटीव्ह रिव्ह्यूचा परिणाम स्पष्टपणे जाणवतोय.
त्यामुळे कलेक्शनवरून विजय देवरकोंडा बॉलिवूडवर राज्य करेल असं म्हणता येणार नाही. चित्रपटाला प्रचंड नकारात्मक प्रतिकिया मिळत आहेत. त्यामुळे चित्रपटाची कमाई पुढे वेग घेणार की मंदावणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.