लाइट, कॅमेरा, अॅक्शन....असे जोराने ओरडत मोठ-मोठ्या स्टार्सना आपल्या इशाऱ्यावर नाचवणारे दिग्दर्शकही अभिनयाच्या चुंबकीय आकर्षणातून सुटू शकलेले नाहीत. आपली प्रतिभा, आपले परिश्रम कायमच पडद्यामागे राहते. कधी तेही जगापुढे यावे, असा विचार म्हणूनच या दिग्दर्शकांच्याही मनात येत असतो, परंतु सर्वांनाच काही अभिनयाचे हे शिवधनुष्य पेलता येत नाही. एखादाच प्रकाश झा, फरहान अख्तर असतो, जो दिग्दर्शक-अभिनेता या दोन्ही भूमिकेत यशस्वी होतो. अशाच काही दिग्दर्शक-अभिनेत्यांची ही एक ओळख...महेश मांजरेकरसंजय दत्तला घेऊन ‘वास्तव’ चित्रपट काढणाऱ्या महेश मांजरेकरचे बॉलीवूडमध्ये जोरदार कौतुक झाले. त्यानंतर महेशने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. संजय गुप्ताच्या ‘काँटे’ चित्रपटात त्याने राज यादव ‘बाली’ ही भूमिका साकारली. महेशचे दिग्दर्शनापेक्षा अभिनय केलेले चित्रपट अधिक आहेत.करण जोहर‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यापूर्वी करण जोहरने ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’ या चित्रपटात शाहरुखच्या मित्राची छोटीशी भूमिका साकारली होती. मात्र, पुढे काही त्याने असे धाडस केले नाही. बऱ्याच वर्षांनी ‘बॉम्बे व्हेल्वेट’मध्ये एक नव्या वळणाची भूमिका मिळाली आणि या चित्रपटात करणने जोरदार अभिनय केला. विशेष म्हणजे, स्वत: अभिनयाचा शौक बाळगणाऱ्या अनुराग कश्यप यांनी करण जोहर यांना संधी दिली.फरहान अख्तर‘दिल चाहता है’ या चित्रपटापासून दिग्दर्शक म्हणून सुरुवात केलेल्या फरहान अख्तरने पुढे ‘रॉक आॅन’, ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटांत अभिनयाची छाप सोडली. त्याचा चेहरा आणि त्याचे व्यक्तिमत्त्व पाहता, त्याला हीरो म्हणून पुढे येण्यास खूप कष्ट करावे लागले, परंतु अभिनयात दम असल्याने त्याने या क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली. फराह खानएके काळची नृत्यदिग्दर्शिका फराह खानने ‘मैं हूं ना’ आणि ‘ओम शांती ओम’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यानंतर ‘शिरीन फरहाद की निकल पडी’ या चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याची चुणूकही दाखविली. संजय लीला भन्साळी यांची बहीण बेला सैगल यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात फराहने फरहादची भूमिका केली होती.प्रकाश झानामवंत दिग्दर्शक प्रकाश झा यांनी ‘जय गंगाजल’ या चित्रपटात भोलानाथ सिंग उर्फ बी. एन. सिंग ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत असतानाही प्रकाश झा यांच्या भूमिकेचे कौतुक झाले. चित्रपटात ज्या पद्धतीने त्यांनी संवादफेक केली आहे, ती खरेच कमालीची आहे. भावनिक दृश्यातही त्यांनी हृदयस्पर्शी अभिनय केला आहे, ज्याची समीक्षकांनीही दखल घेतली आहे.
लाइट, कॅमेरा अन् अॅक्शन!
By admin | Published: March 13, 2016 9:17 PM