Join us  

प्रकाश झा आणि स्टार नायिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2016 2:35 AM

बॉलीवूडमध्ये दिग्गज तारकांना घेऊन चित्रपट बनविणाऱ्या स्टार दिग्दर्शकांची कमी नाही. मात्र, एक असा दिग्दर्शका आहे, ज्याने शबाना आजमी आणि दीप्ती नवलपासून या काळातील काजोल, माधुरी दीक्षित

बॉलीवूडमध्ये दिग्गज तारकांना घेऊन चित्रपट बनविणाऱ्या स्टार दिग्दर्शकांची कमी नाही. मात्र, एक असा दिग्दर्शका आहे, ज्याने शबाना आजमी आणि दीप्ती नवलपासून या काळातील काजोल, माधुरी दीक्षित, करीना कपूर, बिपाशा बसू, दीपिका पदुकोन, कॅ टरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा अश सर्व स्टार नायिकांसोबत चित्रपट बनविले आहेत. उद्या शुक्रवारी प्रकाश झा यांचा चित्रपट ‘जय गंगाजल’ प्रदर्शित होत आहे, ज्यात प्रियांकाने एक प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याचा रोल केला आहे. दिग्दर्शक म्हणून प्रकाश झा यांचा पहिला चित्रपट ‘दामुल’होता. यात दीप्ती नवलने मुख्य भूमिका साकारली होती. शबाना आजमीने त्यांच्या ‘मृत्युदंड’मध्ये काम केले होते. या चित्रपटात माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाला माधुरीच्या सर्वश्रेष्ठ चित्रपटाच्या यादीत ठेवले जाते. कमर्शियल चित्रपटाच्या दिग्गज नायिकांसोबत काम करणारे प्रकाश झा यांनी, आपल्या चित्रपटांपासून आर्ट फिल्म मेकरची प्रतिमा तोडण्यात यश मिळविले. ‘दामुल’मुळे त्यांची तशी ओळख बनली होती. या प्रतिमेला तोडण्यात प्रकाश झा यांना अजय देवगनसोबतच्या ‘दिल क्या करे’ने मोठे योगदान दिले. चित्रपट बॉक्स आॅफिसवर जास्त चालला नव्हता. मात्र, प्रकाश झा यांचे नाते या चित्रपटामुळे कमर्शियल चित्रपटासोबत जोडले गेले. अजयसोबत त्यांनी या चित्रपटानंतर ‘गंगाजल’ आणि ‘अपहरण’मध्येही काम केले. अपहरणमध्ये बिपाशा बसू होती. बिपाशानंतर ‘राजनीति’ मध्ये प्रकाश झा ने कॅ टरिना कैफ, ‘आरक्षण’ मध्ये दीपिका पदुकोण आणि ‘सत्याग्रह’मध्ये करीना कपूर सोबत काम के ले.